• Fri. Sep 18th, 2026

पुष्पा स्टाईलने चंदन तस्करी करणारे वाहन पकडले. 2 कोटी रूपय चंदनाची किंमत.

Bybaba maske

May 5, 2024

पुष्पा स्टाईलने चंदन तस्करी करणारे वाहन पकडले.

2 कोटी रूपय चंदनाची किंमत.

रोखठोक न्युज वार्ताहर 

दिनांक 05/05/2024 रोजी पहाटे 04.30 ते 05.15 वा चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांना गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाली की, एक आयशर वाहन हे तोडलेल्या चंदनाच्या झाडाची वाहतुक करीत असुन ते केज कडुन धारुर कडे जाणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस ठाणे केज व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे कर्मचारी धारुर रोड वरून धारुरकडे जात असतांना नेहरकर यांच्या पेट्रोल पंपा समोर एक आयशर टेंम्पो क्रमांक MH.24.AU.9383 हा उभा असल्याचे आढळुन आले. सदर पथकाने वाहनाच्या चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रियतम काशिनाथ साखरे वय 34, रा. गुरुवारपेठ अंबाजोगाई ता अंबाजोगाई व सोबतचा इसम शंकर पंढरी राख, रा. कौडगाव ता केज, जि. बीड असे नाव सांगितले. 

सदर वाहनाच्या चालकास विश्वासात घेवुन वाहनात काय आहे बाबत विचारले असता चालकाने वाहनात रिकामे कॅरेट असुन त्याच्यापुढे चंदनाच्या झाडाच्या गाभ्याची लाकडे असल्याचे सांगितले. 

चोरीच्या चंदनाची लाकडे ही बालासाहेब दत्तात्रय उर्फ बालाजी जाधव, रा. केज यांचे मालकीचे असुन त्यांच्या सांगण्यावरून सदरची लाकडे जालन्या कडे घेवुन जात असल्याचे सांगितले. 

सदर वाहनात पुढच्या साईडला चंदनाच्या झाडाचा गाभा ठेवण्यासाठी पुष्पा स्टाईल एक चोर कप्पा असुन त्यात चंदनाच्या झाडाचा गाभ्याने भरलेल्या गोण्या ठेवल्या होत्या व पाठीमागील बाजुस भाजीपाल्याचे प्लॅस्टीकचे कॅरेट ठेवले होते. आयशर टेंम्पोत पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन साहेब यांचे समक्ष 60 चंदनाचा गाभा भरलेल्या गोण्या काढुन दिल्या. त्याचे एकुण वजन 1235.5 कि.ग्रॅम किंमती 1,97,68,000/-असे मिळुन आले आहे. सदर कारवाईत एकुण 2,18,31,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आशयर टेंम्पोहस जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत पोलीस स्टेशन केज येथे स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पोलीस स्टेशन केज येथे गुरनं 244/2024 कलम 379,34 भादविसह कलम भारतीय वन अधि. 41, 42, सह कलम महाराष्ट्र वन अधिनियम 26 (फ) प्रमाणे 3 आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चोरीच्या चंदनाच्या झाडाचा मालक बालासाहेब दत्तात्रय उर्फ बालाजी जाधव, रा. केज याचेविरुध्द यापुर्वी बर्दापुर पोलीस स्टेशन गुरनं. 115/2022 अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरनं 17/2022 प्रमाणे न्हे दाखल आहेत.

सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकुर साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक तना तिडके मॅडम, मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज कमलेश मीना साहेब यांच्या ार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पो उप नि. राजेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे बहा. पोलीस निरीक्षक गणेश मुंडे, सह फौ.जायभाय, सह फौ.खेडकर, पो. हवालदार निसार शेख, पो.हवालदार तुषार गायकवाड, पो.हवालदार भागवत शेलार, पोह /कैलास ठोंबरे, पोलीस स्टेशन केज येथील पो.नाईक दिलीप गित्ते, पोह अंमलदार मतीन शेख अ/शिवाजी कागदे, पो अंमलदार संतोष गित्ते, पो अंमलदार महादेव बहिरवाळ, पोअं/प्रकाश मुडे यांनी महत्वाची कामगिरी केली आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!