• Fri. Sep 18th, 2026

कार -ट्रक भिषण अपघातात दोन जागीच ठार तीन जखमी.

Bybaba maske

Jun 26, 2024

कार -ट्रक भिषण अपघातात दोन जागीच ठार तीन जखमी.

 रोखठोक न्युज वार्ताहर 

मस्साजोग ते केज दरम्यान कोरेगाव फाट्याजवळ पहाटे 4:30 वाजता स्विफ्ट कारणे एका ट्रकला, पाठीमागून धडक दिली. त्या अपघातात कारमधील एक स्त्री वय पुरुष जागीच ठार झाले असून, कार जागेवरच चंदामेंदा झाली तर इतर कार मधील दोघे आणि ट्रक ड्रायव्हर असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

बुधवार दिनांक 26 जून रोजी 4 वाजून तीस वाजता पहाटे बीड कडून अंबाजोगाईकडे येणारी ट्रक क्रमांक एम एच 44 ए बी 87 86 हा कोरेगावच्या वळणावर थांबलेला होता. त्यावेळी ट्रक चालक हे त्यांच्या ट्रकची पाहणी करीत असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव स्विफ्ट कार क्रमांक ए पी 39 एस एस 56 57 ने उभ्या ट्रकला जोराची धडक दिली. यात कारमध्ये बसलेले आंध्र प्रदेशातील अनोळखी एक स्त्री व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारच्या पाठीमागे बसलेली श्रुती शंकू ला राहणार गोडी वाडा आंध्र प्रदेश आणि एक अनोळखी पुरुष हे दोघे जखमे झाले. तसेच ट्रक ड्रायव्हर रियाज तुरा खन पठाण रा. पाटोदा जिल्हा बीड हे देखील जखमी झाले आहेत.

हा अपघात एवढा भीषण होता की, अक्षरशः स्विफ्ट डिझायर गाडी पार झालेली असून, ट्रकची देखील मागील बाजू चे डाव्या बाजूचे टायर फुटले आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघेजन जखमी झाले असून दोन मयत व एक जखमी यांची ओळख पटलेली नाही. तर दोघांची ओळख पटली आहे. पोलिसांनी आंध्र प्रदेशातील मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून, मयत व जखमी हे परराज्यातील असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भाषेची अडचणी येत असून, त्यांना तेलगू भाषे व्यतिरिक्त इतर भाषा समजत नाही अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे पोलीस हेड् कॉन्स्टेबल त्रिंबक सोपने पोलीस नाईक राजू गुंजाळ शेख रशीद हे घटनास्थळी रवाना झाले त्यांनी जखमींना मदत केली.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!