• Fri. Sep 18th, 2026

वीज पडून तीन महिला जागीच ठार; एक महिला गंभीर जखमी ????या दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे

Bybaba maske

Jun 26, 2024

वीज पडून तीन महिला जागीच ठार; एक महिला गंभीर जखमी

????या दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे

रोखठोक न्युज वार्ताहर 

  तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता. मात्र यामध्ये चकलांबा येथे आज बुधवार दि.२६ रोजी सायंकाळी साडेपाच सुमारास वीस पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने शालनबाई शेषराव नजन वय 65 यांची सुन लंका हरिभाऊ नजन वय 40 तर विजुबाई बाळासाहेब खेडकर वय41 असा या वीज पडून मयत झालेल्या महिलांचं नाव आहे. या तिन्ही महिला शेतात काम करत असताना आज सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा जागेवरच वीज पडून मृत्यू झाला. तिन्ही महिला चकलांबा येथील रहिवासी असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असता त्यांना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केला आहे. यामध्ये यमुना माणिक खेडकर वय वर्ष 65 या गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!