लोकसभेनंतर आता विधानसभेतही होणार काट्याची लढत.आमदारकी साठी इच्छुकांची गर्दी!
भाजपात नमिताताई मुंदडा तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या शरद पवार गटात पृथ्वीराज साठे यांचा गेम होण्याचे जास्त शक्यता
संपादकीय:बाबासाहेब मस्के
लोकसभा निवडणुकीत यंदा काट्याची लढत झाली. शेवटच्या क्षणापर्यंत खचलेल्या निकालात बंजरग सोनवणे यांनी निसटता विजय मिळवत गुलाल उधळला.आता विधानसभे साठी उमेदवारा बाबत तर्क लढवले जात असताना इच्छुक मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.सद्या प्रसार माध्यमातून,वृत्तपत्रातून बातम्या देऊन चाचपणी करत आहेत तर काही जण गाठीभेटी घेण्यावर भर देत आहेत.
लोकसभेत केज विधानसभेत पंकजाताई मुंडे यांना 13798 मताची कमी लीड भेटल्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.सद्या परिस्थितीत महाविकास आघाडी जरी एकसंघ वाटत असली तरी महायुतीत काही अलबेल नसल्याच दिसत आहे.विद्यामान आमदार नमिताताई मुंदडा या भाजप आमदार असल्या तरी त्या भाजप कडून लढतीलच असी कुठलीच गॅरंटी सद्या तरी दिली जाऊ शकत नाही.त्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील असे राजकीय जानकरांचा अंदाज आहे.
त्यामुळेच माजी आमदार संगिताताई ठोंबरे या सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.त्या निमित्ताने मराठा आरक्षण आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील व ओबीसीं अंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके व नवनाथ कांबळे यांची भेट घेऊन त्यांनी केज मतदार संघात चर्चेत रहाण्याचा प्रयत्न चालवला आहे.त्यात काँग्रेस तर्फे विधानसभा लढवलेल्या व आता शिंदे गटात असलेल्या डॉक्टर अंजली घाडगे या सुद्दा सक्रिय झाल्या आहेत त्या लवकरच केज विधानसभेचा दौरा करणार आहेत. बहुजन विकास परिषदेचे संस्थापक रमेश तात्या गालफाडे यांनी ही निवडणूक लढवणार असे वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध केल आहे.
सद्या शरद पवार गटाला चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे कारण शरद पवार गटाकडून लोकसभेत बंजरग सोनवणे यांनी निवडुन येऊन चमत्कार केला असल्याने तोच चमत्कार विधानसभेत होईल या दृष्टिकोनातून सगळ्याचा ओढा शरद पवार गटा कडे आहे.पण यात पहिल्या पासून एकनिष्ठ असलेले माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचे काय हा प्रश्न अनुत्तरित रहातो का काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.गेल्या दहा वर्षा पासुन ते या मतरसंघात मेहनत घेत आहेत.गेल्या वेळेस ते एकत्रीत राष्ट्रवादी काँग्रेस चे अचानक दिलेले उमेदवार होते कारण ऐनवेळेस नमिताताई मुंदडा यांनी भाजप कडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली व विजयी झाले.पण या वेळेस परिस्थिती वेगळी आहे.या वेळेस इच्छुक जास्त आहेत.लोकसभेत आमदार असताना कमी मताधिक्य दिल्यामुळे पुन्हा उमेदवारी दिली जाते का नाही हे आताच सांगता येत नाही अश्यात संगिताताई ठोंबरे आचानक सक्रिय झाल्याने भाजप मध्ये काही वेगळ्या घडमोडी घडत असल्याच जाणवत आहे.भाजपचा एक गट सोडला तर अन्य गटात मुंदडा यांना विरोध होऊ शकतो.त्यात आडसकर गट सुद्धा विरोधात असल्याच बोलल जात आहे.
त्यामुळे भाजपात नमिताताई मुंदडा व राष्ट्रवादी काँग्रेस च्या शरद पवार गटात पृथ्वीराज साठे यांचा गेम होण्याचे जास्त शक्यता दिसत आहे.खरी परिस्थिती लवकर सगळ्यांच्या समोर लवकरच येईल तूर्तास क्रमशः
