• Fri. Sep 18th, 2026

कुंडलिक खांडे चे कार्यालय फोडले. क्लिप व्हायरल होताच मुंडे समर्थक आक्रमक.

Bybaba maske

Jun 27, 2024

कुंडलिक खांडे चे कार्यालय फोडले.

क्लिप व्हायरल होताच मुंडे समर्थक आक्रमक.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड-येथील शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची गुरुवारी (दि. २७) तोडफोड करण्यात आली आहे. मुंडे समर्थकांनी ही तोडफोड केल्याच्या चर्चा असून बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आज सकाळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात खांडे यांनी ‘आपण फक्त आपल्या गावात पंकजा मुंडेंना लीड दिली, विधानसभेला ओबीसी मते मिळविण्यासाठी मला ते आवश्यक होते, पण आपण बप्पाचेच काम केले आहे. सगळी यंत्रणा त्यांना दिली आणि पैसेही पुरवले’ असे सांगताना ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे यात सदरचा पदाधिकारी आपण विश्वासघात केल्याचे कबुल करत आहे. तर दुसऱ्या ऑडीओ क्लीपमध्ये तो पदाधिकारी पक्षांतर करण्याची तयारी करताना देखील ऐकायला मिळत आहे.’ आपण आपल्या कार्यालयात लगेच शरद पवारांचा फोटो लाऊ, मी इथे नेहमी जनता दरबार भरवतो, मी थेट अंगावर जाऊ शकतो’ असे म्हटले होते. तसेच या ऑडीओ क्लीपमध्ये कथीत पदाधिकारी चक्क मंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याचा कट करित असल्याचे ऐकायला मिळत आहे. सदर ऑडीओ क्लीप मतदानाच्या अगोदरची असावी असा अंदाज असून धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगड पडले तर आपले मतदान वाढेल असे भाष्य केले होते. यानंतर आज काही वेळापूर्वी मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडे यांचे जालना रोडवरील कार्यालयाचीतोडफोड केल्याचे चित्र आहे. आता या घटनेमुळे बीड शहरातील वातावरण आणखी चिघळले आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!