• Fri. Sep 18th, 2026

मनोज जंरागे यांच्या मातोरी गावात दोन गटात तुफान राडा. पोलीसांकडून शांततेच अहवान  धनंजय मुंडे कडून प्रशासन तात्काळ दखल घेण्याचे ट्विटर वर अहवान 

Bybaba maske

Jun 27, 2024

मनोज जंरागे यांच्या मातोरी गावात दोन गटात तुफान राडा.

पोलीसांकडून शांततेच अहवान 

धनंजय मुंडे कडून प्रशासन तात्काळ दखल घेण्याचे ट्विटर वर अहवान 

रोखठोक न्युज वार्ताहर 

डीजे वाजविण्यावरून मातोरी (ता. शिरूर का.) येथे दोन गट आमनेसामने आले आणि प्रचंड दगडफेक झाली. या दगडफेकीत डीजेसह अनेक वाहनांचे मोठे नुकसान मातोरी हे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे गाव आहे. या घटनेनंतर गावात तणावाची परिस्थिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओबीसी आओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आज भगवानगडावर जाणार होते. त्यांना पाडळशिंगी येथून घेण्यासाठी तिंतरवणी, माळेगाव, पारगाव या ठिकाणचे ग्रामस्थ डिजे लावून पाडळशिंगीकडे निघालेले होते. त्यांनी सोबत आणलेल्या डीजेवर मातोरीत आल्यानंतर दोन गाणे वाजवले. काही कार्यकर्त्यांनी इथे एका समाजाविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे दुसऱ्या बाजुने मातोरी ग्रामस्थांनी त्यांना डीजे बंद करून गावातून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र मातोरी ग्रामस्थ आणि हाकेंना आणण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पर्यायाने दोन्ही गटात प्रचंड दगडफेक झाली. यात अनेकांची डोकी फुटली आहेत. तर डीजेचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. चार ते पाच दुचाकीं यावेळी फोडण्यात

आलेल्या आहेत.ही घटना समजल्यानंतर आजुबाजुच्या अनेक गावांनी मातोरी गावाला चोहोबाजूंनी घेरलेले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड संख्येने लोक जमलेली आहेत. पोलीसांनी जास्तीची कुमक मागवून मातोरीकडे धाव घेतलेली आहे.

धनंजय मुंडे कडून प्रशासन तात्काळ दखल घेण्याचे ट्विटर वर अहवान केले असून नागरिकांना शांत रहाण्याचे अहवानकेले आहे

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!