• Fri. Sep 18th, 2026

पंकजाताई मुंडे यांना विधानपरिषद का?केंद्रात राज्यसभा व मंत्रीपद का नाही? पुन्हा महाराष्ट्रत सरकार येईल हे अनिश्चित!! ओबीसीं मत खेचण्या साठी फडणवीस खेळी

Bybaba maske

Jun 28, 2024

पंकजाताई मुंडे यांना विधानपरिषद का?केंद्रात राज्यसभा व मंत्रीपद का नाही?

पुन्हा महाराष्ट्रत सरकार येईल हे अनिश्चित!!

ओबीसीं मत खेचण्या साठी फडणवीस खेळी

रोखठोक न्युज वार्ताहर

बीड लोकसभेची निवडणुक जोखमीची झाल्यावर चालू खासदार व पंकजाताई यांच्या भगिनी प्रितमताई मुंडे यांची उमेदवारी कापून पंकजाताई मुंडे यांना दिली.मराठा आरक्षणाचा वाद पेटलेला असताना ही आत्मघातकी खेळी भाजपच्या पक्ष कडून करण्यात आली गेले पाच वर्ष भाजप पक्षात हिरवळ असताना ओबीसीं कार्ड म्हणून भागवत कराड,राजेश कराड यांना उमेदवारी देऊन पंकजाताई यांना डावलण्यात आले.बीड जिल्ह्यात आरक्षणाच लोण असताना पंकजाताई यांनी अटीतटीच्या 6 लाखाच्या आसपास मते घेऊन आपली ताकद दाखवली.तसेच त्या पराभूत झाल्या नंतर त्यांच्या चाहत्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या असे नेतृत्व व प्रेम करणारे चहाते ही फिल्म अभिनेता अभिनेत्री यांच्या नंतर राजकीय व्यक्तीना भेटणे हे तसे दुर्लभच पण हे पंकजा मुंडे यांना नशीबाने भेटले.अश्या या नेतृत्व परळी मधून विधानसभेत ‘स्व’ नेतृत्वानेच पराभूत केल्याचे बोलले जात आसते.त्यांना पाच वर्ष विजनवासात ठेवले गेले आणि आज आचानक मराठा-ओबीसीं वाद पेटला आहे,त्यावेळेस भाजप कडे प्रभावी ओबीसीं चेहरा नाही.जो ओबीसीं चेहरा आहे तो छगन भुजबळ यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे.त्यामुळे आपसूकच आता भाजपला पंकजाताई मुंडे यांची गरज भासु लागली आहे.पण पंकजाताई यांनी विधानपरिषद न घेता व दोन महिन्याच मंत्रीपद न घेता,राज्यसभेवर जावे व केंद्रात मंत्रीपद घ्यावे असे आता त्यांचे समर्थकांना वाटत आहे.कारण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर भाजप सरकार येईल असे आता तरी वाटत नाही. मघ उरलेले पाच वर्ष फक्त आमदार म्हणून राहायचे का हा प्रश्न आहे.त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी राज्यसभेवर जाऊन मंत्रीपद घ्यावे व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे अधुरे स्वप्न पुर्ण करावे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!