• Thu. Jun 25th, 2026

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्यावर परळीत गुन्हा दाखल. कथित ऑडिओ क्लिप भोवली.

Bybaba maske

Jun 28, 2024

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्यावर परळीत गुन्हा दाखल. 

 कथित ऑडिओ क्लिप भोवली.

रोखठोक न्युज वार्ताहर 

शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिप मध्ये मी पंकजा मुंडेंना धोका दिला, याबरोबरच धनंजय मुंडे यांची गाडी फोडू, त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्या विरोधात आवाज उठवू अशा पद्धतीचे तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या प्रकरणी आता परळी पोलीस ठाण्यात न. प. गटनेते वाल्मीक कराड यांच्या फिर्यादीवरून कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी पंकजाताईंना जाणीवपूर्वक धोका दिला, 376 बूथ बजरंग बाप्पांच्या ताब्यात दिले एवढेच नाही तर

निवडणुकीत बजरंग बाप्पांना पैसाही पुरविला तसेच धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्याबाबतीत आक्षेपार्ह शिव्या दिल्याची वक्तव्येही या व्हायरल कथित ऑडिओ क्लिपमध्ये केल्याचे दिसून येते. ही व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप व यातील संवाद शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्यामधील असल्याचे समोर – आले आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक करू, त्यांची गाडी फोडू अशा प्रकारची काही सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्येही ऐकायला मिळतात. या वरूनच आता परळी नगर परिषदेचे

या वरूनच आता परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक कराड यांनी पोलिसात धाव घेतली आहे. या दोघांच्या विरोधात फिर्याद दाखल करून कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्ये करून ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपीं विरुद्ध गुरन. 103/ 2024 कलम 153 (अ) 505(2) 34, भादवी सह कलम 66 (C) IT Act प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. लोहकरे हे करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!