• Fri. Sep 18th, 2026

भरधाव कारच्या धडकेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

Bybaba maske

Jul 7, 2024

भरधाव कारच्या धडकेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

रोखठोक न्युज वार्ताहर

बीड – पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी निघालेले दिंद्रुड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक श्रीधर नन्नवरे यांचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज रविवारी (दि.०७) सकाळी ७ च्या सुमारास नेकनूर हद्दीत झाला.

राष्ट्रीय महामार्ग ५४८ वरून आज सकाळी पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी सिरसाळ्याचे पीएसआय रमेश धोंडीराम नागरगोजे व दिंद्रुडचे पीएसआय श्रीधर नन्नवरे हे दुचाकी (एम.एच 23 ए. के. ९३९७) वरून जात होते. यावेळी स्विफ्ट कर (एम.एच.२३ बी.सी.२१०८) ने धडक दिल्याने यात श्रीधर नन्नवरे यांचा जागीच मृत्यु झाला तर नागरगोजे हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून कार चालकाने पळ काढल्याचे कळते.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!