• Tue. Aug 25th, 2026

पोलिसांना टिप(खबरी) देणारे…ब्लॅकमेलर आहेत का? टेम्पोचालका वर पोलीसांची कारवाई तर टेम्पोचालकाची टेम्पो अडवणार्या वर गुन्हा नोंद.

Bybaba maske

Jul 7, 2024

पोलिसांना टिप(खबरी) देणारे…ब्लॅकमेलर आहेत का?

टेम्पोचालका वर पोलीसांची कारवाई तर टेम्पोचालकाची टेम्पो अडवणार्या वर गुन्हा नोंद.

रोखठोक न्युज वार्ताहर

सद्या पोलीस दुसरे अवैध धंद्यावर कारवाई करण्यापेक्षा गुरांच्या वाहतुकीवर जास्त लक्ष असल्याच दिसून येत आहे.कारण सगळ्यात जास्त कारवाई ही गुरांच्या वाहतूक होत असलेल्यान वर कारवाई चे प्रमाण जास्त आहे.साळेगाव व नेकनुर हे गुरांच्या बाजारा साठी प्रसिद्ध आहेत. येथे महाराष्ट्रातून जनावरे खरेदी करण्यासाठी व्यापारी येत असतात.दिवसभर खरेदी करून ते रात्रीत टेम्पोतून जनावरांची वहातुक करतात. अश्यातच मग काही जण जनावरं घेऊन जाणारे टेम्पो अडवतात त्यांना पैश्याची मागणी करतात पैसे नाही दिले की ते पोलीसांना कळवतात मघ पोलीस त्यांच्यावर छापा टाकून कारवाई करतात.व खबऱ्या द्वारे टिप भेटली असे सांगून ही कारवाई होते. पोलीसांकडून कारवाई झाल्यानंतर त्या जनावरांचे काय होते?

अश्यातच गरूवारी केज शहरात हाॅटेल अनिल भोजनालय जवळ अगोदर गुरांचा टेम्पो दोघांनी अडवला व दमदाटी केली त्यांच्या विरोधात टेम्पो चालकानी केज पोलीसात गुन्हा दाखल केला.तर केज पोलीसांकडून टेम्पोत क्षमतेपेक्षा जास्त म्हशी भरल्या म्हणून गुन्हा दाखल.त्यामुळेच कुठे तरी शंका उत्पन्न होत आहे.पोलीसांकडून त्या दिशेने तपास करावा असे आता व्यापारी चर्चा करत आहेत.कारण प्रत्येक बाजारी व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे.

नेकनूर (ता. जि. बीड) येथील टेम्पो चालक मोहसीनोद्दीन खुरशीद अहेमद काझी हा ४ जुलै रोजी रात्री ९ वाजता साळेगाव (ता. केज) येथून १६ म्हशी टेम्पोत भरून म्हशीचे भाडे घेऊन नेकनूरकडे निघाला होता. शहारातील अनिल भोजनालयासमोर अशोक खेत्रे, भारत राऊत (दोघे रा. कानडी माळी) या दोघांनी टेम्पो अडवून म्हशी तुम्ही कोठून आणल्या व कुठे घेऊन जात आहेत असे विचारुन दमदाटी केली. हा प्रकार सुरू असताना बघ्यांची गर्दी जमा झाली. अशी तक्रार या टेम्पो चालकाने दिल्यावरून वरील दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

क्षमतेपेक्षा अधिक म्हशी; टेम्पो पकडला

विनापरवाना क्षमतेपेक्षा जास्त म्हशी भरून चाललेला टेम्पो केज पोलिसांनी पकडला असून १६ म्हशी व टेम्पो असा १० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना एक टेम्पो विना परवाना क्षमतेपक्षा जास्त म्हशी क्रूरतेने व निर्दयीपणे भरून चालल्याची माहिती मिळाली. त्यांच्या आदेशावरून जमादार रुक्मिण पाचपिंडे, पोलिस अंमलदार प्रकाश मुंडे, पोलिस शिपाई नितीन जाधव यांच्या पथकाने ४ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मांजरसुंबा रस्त्यावर शहरातील अनिल भोजनालयासमोर थांबलेला सदरील टेम्पो (एम. एच. ०४ जे. यु. १५६७) पकडला. टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोत १६ म्हशी या क्रूरतेने व निर्दयीपणे भरल्याचे दिसून आले. पोलिसांनी ५ लाख ४० हजार रुपयांच्या १६ म्हशी व ५ लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला आहे.टेम्पो चालकाविरुद्ध  केज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!