• Sat. Sep 19th, 2026

ट्रक दुचाकीचा भीषण अपघात एक जागीच ठार.

Bybaba maske

Jul 16, 2024

ट्रक दुचाकीचा भीषण अपघात एक जागीच ठार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून, या भीषण अपघातात दुचाकी स्वराचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला आहे. तसेच त्याच्या दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत.

बीड तालुक्यातून गेलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा पारगाव परिसरात, आज मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी, सकाळी भरधाव वेगात आलेल्या ट्रक ने दुचाकी स्वराला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव बाहेर पडला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्याच्या दुचाकीचे दोन तुकडे झाले. यावेळी वाहनधारकांची प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. लांबपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या. बाळासाहेब दिलीप भोसले वय 26 वर्ष असे त्या अपघातातील मयताचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. सदर घटनेने परिसरात मोठी केली जात आहे. याचा पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!