• Sat. Sep 19th, 2026

रात्रीच्या वेळी पैसे, दुचाकी लुटणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पकडले. 

Bybaba maske

Jul 16, 2024

रात्रीच्या वेळी पैसे, दुचाकी लुटणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पकडले. 

सारणी सांगवी येथील प्रकारः गुन्हा दाखल

रोखठोक न्युज वार्ताहर 

रात्रीच्या वेळी घरासमोर दुचाकी लावत असलेल्या तरुणाच्या खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने काढून घेत हॅण्डल लॉक तोडून दुचाकी घेऊन निघालेल्या तिघांना लोकांनी पाठलाग करीत पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना केज तालुक्यातील सारणी सांगवी येथे घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

केज मांजरसुंबा रस्त्यावरील सारणी (सां.) येथील पंढरी त्रिंबक घोळवे हा तरुण १३ जुलै रोजी रात्री १० वाजता त्याची दुचाकी (एम.एच. ४४ जे. ९३८३) घरासमोर उभा करत असताना मांजरसुंब्याकडून दुचाकीवर आलेल्या अनोळखी तिघांनी जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. त्यानंतर एकाने त्यांच्या दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना पंढरी घोळवे यांनी आरडाओरड केला. याचवेळी त्यांचे शेजारी दत्तात्रय अशोक घोळवे, चंद्रकांत अशोक घोळवे, प्रदीप शिवाजी घोळवे व इतर लोकांनी त्यांचा पाठलाग करीत तिघांना पकडले.

पकडलेल्या तिघांकडे नाव व गावाची विचारणा केली असता त्यांनी आवेज ऊर्फ खाजा शेख (रा. केज), अनिकेत भारत जाधव (रा. बोबडेवाडी), जुबेर मुस्ताक फारुकी (रा. रोजा मोहल्ला, केज) अशी सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून त्या तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

पंढरी घोळवे यांच्या तक्रारीवरून आवेज ऊर्फ खाजा शेख, अनिकेत जाधव, जुबेर फारुकी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करीत आहेत

रात्रीच्या वेळी पैसे, दुचाकी लुटणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पकडले.
सारणी सांगवी येथील प्रकारः गुन्हा दाखल
रोखठोक न्युज वार्ताहर
रात्रीच्या वेळी घरासमोर दुचाकी लावत असलेल्या तरुणाच्या खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने काढून घेत हॅण्डल लॉक तोडून दुचाकी घेऊन निघालेल्या तिघांना लोकांनी पाठलाग करीत पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना केज तालुक्यातील सारणी सांगवी येथे घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

केज मांजरसुंबा रस्त्यावरील सारणी (सां.) येथील पंढरी त्रिंबक घोळवे हा तरुण १३ जुलै रोजी रात्री १० वाजता त्याची दुचाकी (एम.एच. ४४ जे. ९३८३) घरासमोर उभा करत असताना मांजरसुंब्याकडून दुचाकीवर आलेल्या अनोळखी तिघांनी जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. त्यानंतर एकाने त्यांच्या दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना पंढरी घोळवे यांनी आरडाओरड केला. याचवेळी त्यांचे शेजारी दत्तात्रय अशोक घोळवे, चंद्रकांत अशोक घोळवे, प्रदीप शिवाजी घोळवे व इतर लोकांनी त्यांचा पाठलाग करीत तिघांना पकडले.

पकडलेल्या तिघांकडे नाव व गावाची विचारणा केली असता त्यांनी आवेज ऊर्फ खाजा शेख (रा. केज), अनिकेत भारत जाधव (रा. बोबडेवाडी), जुबेर मुस्ताक फारुकी (रा. रोजा मोहल्ला, केज) अशी सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून त्या तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

पंढरी घोळवे यांच्या तक्रारीवरून आवेज ऊर्फ खाजा शेख, अनिकेत जाधव, जुबेर फारुकी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करीत आहेत.

.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!