• Thu. Jun 25th, 2026

केज नगरपंचायत चा भोंगळ कारभार. पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात.

Bybaba maske

Jul 15, 2024

केज नगरपंचायत चा भोंगळ कारभार.

पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज नगरपंचायत चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे वार्ड क्रमांक 16 मध्ये नालीचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे.गेल्या आठ दिवसापूर्वीच काँग्रेस शहराध्यक्ष ताहेर कुरेशी वार्ड क्रमांक 16 च्या नाली,घाण,कचरा या विषयावर केज नगरपंचायत समोर उपोषणास बसले होते त्या वेळेस मागण्या मान्य करण्याचे अश्वासन देऊन उपोषण स्थगित करण्यास लावले होते.पण त्यांच्या उपोषणाची कुठलीच दखल नगरपंचायत ने घेतल्याची दिसून येत नाही.असंवेदनशील नगरपंचायत चा खरा चेहरा आठ दिवसांत उघडा पडला केज वार्ड क्रमांक 16 येथील खारी विहीर परिसरातील नालीतून कचरा न काढल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले असून अक्षरशा तलावाचे स्वरूप आले आहे.

सलीम हाफिज सहाब यांच्या सर्व घरभर तळे साचले आहे.गेल्या अडीच वर्षांत बडे बडे बाता मारणारे आता तरी स्वच्छता हातात घेतील असे नागरिक अपेक्षा करत आहेत.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!