• Thu. Jun 25th, 2026

चक्रीवाढ व्याजासाठी सावकाराकडून होत असलेल्या जाचास कंटाळून नगरपंचायतीच्या ३१ वर्षीय सफाई कामगारांची आत्महत्या.

Bybaba maske

Jul 15, 2024

चक्रीवाढ व्याजासाठी सावकाराकडून होत असलेल्या जाचास कंटाळून नगरपंचायतीच्या ३१ वर्षीय सफाई कामगारांची आत्महत्या.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज – व्याजाने घेतलेल्या ५० हजार रुपयांची परतफेड करून चक्रीवाढ व्याजासाठी सावकाराकडून होत असलेल्या जाचास कंटाळून नगरपंचायतीच्या ३१ वर्षीय सफाई कामगाराने आपल्या बहिणीच्या घरी आत्महत्या केल्याची घटना ७ जुलै रोजी सकाळी केज शहरात घडली होती. याप्रकरणी मयत शिपायाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सावकार संजय रामा गुंड (रा. गुंडगल्ली, केज) याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

केज शहरातील भीमनगर भागातील धम्मपाल नंदकुमार मस्के (वय ३१) हा तरुण नगरपंचायतीत सफाई कामगार पदावर कार्यरत होता. धम्मपाल याने त्याच्या आईच्या आजारावर उपचार करण्यासाठी शहरातील गुंडगल्ली भागातील खाजगी सावकार संजय रामा गुंड याच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात सावकार संजय गुंड याने त्याचे पासबुक व एटीएम कार्ड त्याच्याकडे ठेवले होते. तो त्याची पगार झाली की त्याचे दुचाकीवर बसवून बँकेकडे नेऊन एटीएमव्दारे पैसे काढून चक्रीवाढ व्याजाने पैसे घेत होता. त्याने दिलेल्या ५० हजार रुपयांच्या रक्कमेची परतफेड केली असताना तो नेहमी तुझ्याकडे व्याजाचे पैसे राहिले आहेत. असे म्हणत वारंवार पैसे मागून त्रास देत असल्याने धम्मपाल हा नेहमी घरी येऊन चिंताग्रस्त बसत होता. त्याला त्याच्या आईने व नातेवाईकांनी समसावून सांगत. तर त्याचे शंकर रामभाऊ फंदे यांनी सावकार संजय गुंड यास आंबेडकर चौकात समजावून सांगून व्यवहार मिटवून घ्या असे सांगितल्यावर गुंड याने आमचे आम्ही बघून घेऊ म्हणाला होता. तर ५ जुलै रोजी संजय गुंड याने आंबेडकर चौकात व्याजाचे पैशाची मागणी करीत धमकावून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्याकडील बँकेचे पासबुक व एटीएम कार्ड देत नसल्याने घर खर्च भागवायचा कसा ? म्हणत घरात रडत

बसला असताना त्याला आई व आजीने सावकार संजय गुंडविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यास सांगितले. मात्र पोलिसात गेल्यास तो परत जास्त त्रास देईल, तो गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याने बरेच लोकांना व्याजाचे पैशासाठी त्रास दिलेला आहे. म्हणून तो घाबरून गेला. शेवटी धम्मपाल मस्के याने सावकार संजय गुंड याच्या जाचास कटांळून त्याच्या भीतीपोटी ७ जुलै रोजी सकाळी त्याची बहीण दामिनी शंकर फंदे ही घरी जाऊन घरात आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी तक्रार त्याची आई मंगल नंदकुमार मस्के यांनी दिल्यावरून सावकार संजय गुंड याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!