• Sat. Sep 19th, 2026

वाहनाच्या धडकेत तरूण ठार.अज्ञात वाहनाचा शोध सुरू.

Bybaba maske

Jul 31, 2024

वाहनाच्या धडकेत तरूण ठार.अज्ञात वाहनाचा शोध सुरू.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज – केज तालुक्यातील देवगाव येथील प्रवीण लक्ष्मण मुंडे हा ३० जुलै रोजी दुपारी कोरडेवाडी (ता. केज) येथे बहिणीकडे गेला होता. रात्री ८.३० वाजता परत गावाकडे दुचाकीवरून (एम. एच. १४ जी.डब्ल्यू. ३१९०) येत असताना

विडा येथे कोरडेवाडीकडे भरधाव वेगाने चाललेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात प्रवीण मुंडे याच्या डोक्याला गंभीर जखम होऊन तो जागीच ठार झाला. अपघातानंतर धडक देणारे वाहन घेऊन चालक पसार झाला. या घटनेची माहित मिळाल्यानंतर विडा बिटचे सहाय्यक फौजदार राजू वाघमारे, जमादार राजू वंजारे यांनी घटनास्थळी भेट देत विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून शवविच्छेदन करून घेत या तरुणाचा मृतदेह नातेवाईकांकडे स्वाधीन केला.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!