बचत गटाच्या गरिब महिलेचे ४६, ८०० रुपये झाले गहाळ ; केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रोखठोक न्युज वार्ताहर
शेतातील मजुरी करुण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलेचे पैसे भरण्यासाठी घेऊन जात असता तब्बल ४६,८०० रुपये गहाळ झाले आहेत.
केज तालुक्यातील मौजे कोटी येथील सौ. कोमल कृष्णा शिनगारे वय ३० वर्ष या शेतातील मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यावरच त्यांच्या कुटुबांची उपजीवीका आहे .तसेच त्यांनी मौजे कोटी येथील सर्व मागासवर्गीय महिलांना एकत्र करून रमाई महिला बचत गट स्थापन केला तो गट नवचेतना सर्वांगिन विकास संस्था केज यांच्याशी जोडला गेला. त्या माध्यमातून महिलांना कर्ज देणे व परतफेड करणे आदि कामे त्या गटाच्या माध्यमातून करत होत्या. दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी त्या मौजे कोटी येथुन बचत गटातील महिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड तथा पैसे जमा करण्यासाठी केज येथील आयडीबीआय बँकेत जात असता दुपारी ३.३० वाजता माऊली मेडीकल केज ते येवले चहावाले केज-बीड रोडवर त्याच्या पर्समधुन रोख रक्कम ४६,८०० रुपये गहाळ झाले आहेत. त्यांच्या सदरील गोष्ट लक्षात आली असता त्यांनी रोडवर शोधाशोध केली परंतु रक्कम सापडत नसल्याने त्यांनी केज पोलिस गण्यात एक लेखी अर्ज दिला असता सौ. कोमल कृष्णा शिनगारे याच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. चौधरी हे करत आहेत.
चौकट
सदरील बचत गटाचे ४६ ,८०० रुपये गहाळ झालेमुळे सौ. कोमल कृष्णा शिनगारे यांना मोठा धक्का बसलेमुळे त्यांची तब्बेत खालावली असून तसेच परिस्थिती बेताची असुन आता पैसे कसे भरायचे ? हा प्रश्न त्याच्यासमोर पडला आहे .