आमदारांनी उद्घाटनाच्या धामधुमीत तालुका क्रीडा संकुल गावकऱ्यांच्या विरोधात रेटले.
पक्के घरे पाडून क्रीडांगण करण्याचा घाट.
सरपंचा विरोध असताना केले उद्घाटन!

रोखठोक न्युज वार्ताहर
आगामी विधानसभा निवडणूक अनुषंगाने विद्यमान आमदारांनी उद्घाटन, शुभारंभ करण्यात व्यस्त आहेत. आपल्या हाताने हा कार्यक्रम करून श्रेय घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. मग त्यात कुठे विरोध होतोय तरी पण कार्यक्रम रेटून घेऊन जात आहेत.
केज तालुक्यातील पिसेगाव येथील गायरानात तालुका क्रीडांगण मंजूर झाले आहे.निवडणूकीच्या तोंडावर त्याचे उद्घाटन करण्यासाठी आमदार नमिताताई यांनी घाई केली व येथेच त्यांची घाई नडली.पिसेगाव गायरानात गावातील गरीब दलित व वंजारी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात तेथे पक्के घरे करून गेल्या 25/30 वर्षांपासून तेथे राहतात आता होणाऱ्या क्रीडांगण मुळे गायरानात रहानारे लोक विस्थापित होणार आहेत त्यामुळे सर्वच गायरान जमीनी वर रहाणारे भयभीत झाले असून त्यांनी एकत्रित येऊन क्रीडांगणाला विरोध केला.त्याच वेळेस आमदार, तहसीलदार यांनी तुम्हाला वेगळी जाग देऊ व घरकुल योजनेंतर्गत घरकुल देण्यात येईल असे तोंडी अश्वासन देऊन ही गायरान धारक माघार घेण्यासाठी तयार नव्हते ते लेखी आश्वासन मागत होते.तरी पण आम्ही तुम्हाला दुसरी जागा दिल्याशिवाय येथील क्रीडांगणाच काम चालू करणार नाहीत आज फक्त उद्घाटन करू द्या अशी अश्वासनाची बोळवण करून उद्घाटन समारंभ उरकून घेतला.
या उद्घाटन समारंभ सोहळ्याला पिसेगावचे संरपच हजर राहिले नाहीत व पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट करून क्रीडांगणास विरोध दर्शवला आहे.
याच पिसेगावच्या गायरानात एमआयडीसीचा करण्याचा घाट घातला जात आहे.जर या गायरान जमीनीत क्रीडांगण गावकरी होऊ देत नसतील तर मग एमआयडीसी कशी उभी राहू शकते हे बघणे अविचत्याच राहील.पिसेगावच्या दोन लाडक्या आमदाराच्या कार्यकर्त्या मुळे गायरान धाराकावर ही वेळ आल्याची गायरान धारकात बोलले जात आहे.
अशी संभ्रमाची अवस्था लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहाची सुद्धा झाली आहे.यात आजी माजी आमदारात पोस्टर वाॅर चालू आहे.माजी आमदार संगिताताई ठोंबरे म्हणतात मी सभागृह मंजूर केले तर आमदार नमिताताई मुंदडा यांनी निधी आणला व पुन्हा जास्तीचा निधी मीच आणला यांच्यात वादविवाद सुरू आहे संगिताताई ठोंबरे यांनी लावलेले बॅनर कार्यकर्त्यांना झाकण्याची वेळ आली.पण आज जरी किती ही बॅनर झाकले तरी निवडणूकी नंतर कोणाचा कोंबडा आरवतो ते कळेलच
तर ईकडे वंजारा समाजातील युवक म्हणातायत की गेल्या पाच वर्षा नंतर अचानक निवडणूकीच्या तोंडावर लोकनेत गोपीनाथराव मुंडे यांच्या सभागृहाची आठवण आली असे सोशल मीडियावर पोस्ट टाकत आहेत.
