• Sat. Jan 25th, 2025

काॅप नगरसेवक घेऊ लागले निर्णय, दलित नगराध्यक्ष चा करू लागले अपमान. जनतेतून निवडून आला नाहीत याचा हारूण इनामदार यांना विसर.

Bybaba maske

Dec 2, 2024

काॅप नगरसेवक घेऊ लागले निर्णय, दलित नगराध्यक्ष चा करू लागले अपमान.

जनतेतून निवडून आला नाहीत याचा हारूण इनामदार यांना विसर.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरात गेल्या दोन दिवसांपासून काॅप नगरसेवक असलेले हारून इनामदार हे विसरलेत की आपल्यास वार्ड क्रमांक 6 मधील जनतेने पराजित केले आहे व आपण मागच्या दाराने नगरसेवकांच्या मतावर काॅप नगरसेवक म्हणून मागच्या दाराने प्रवेश केला आहे.साधे गट नेता सुधा आपण नाहीत. हे विसरून दलित नगराध्यक्ष असलेल्या सिता बनसोड यांना डावलून दोन दिवस झाले निर्णय घेऊन प्रसाद माध्यमातून आपले उदो उदो करून घेत आहेत मग त्या मध्ये केज मधील व्यावसायिकांकडून झालेले रस्त्याच अतिक्रमण असो त्या साठी रस्त्यावर उतरून 

व्यावसायिकांना रस्ते मोकळे करण्याचे आदेश असो किंवा वार्ड क्रमांक आठ मधील आपली पत्नी नगरसेविका असलेल्या वार्डात रस्ता खूला करणे असो यात जाणूनबुजून दलित नगराध्यक्ष असलेल्या सिता बनसोड याना प्रसिद्धी पासुन दूर ठेवण्याचा प्रयत्न चालवला जात आहे.

केज मतरसंघातून विधानसभे साठी दलित नगराध्यक्ष म्हणून त्यांची अपक्ष उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी दाखल केली होती पण राशप गटाकडून झालेल्या हातमिळवणी मध्ये उमेदवारी वापस घेतली व राशप उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा प्रचार सुद्धा केला पण राशप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर अचानक सहयोगी सदस्य असलेले नगरसेवक हारून इनामदार सक्रिय झाले पण दलित नगराध्यक्ष असलेल्या आपल्या नगराध्यक्षालाच विसरले व स्वताच निर्णय घेत केज शहरात फिरत आहेत. त्यात नगराध्यक्ष पण गप्प असल्याने हे कोडे सुटत नाही त्यामुळेच केज शहरात वेगळीच चर्चा चालू असून सहयोगी(काॅप)नगरसेवक, नगराध्यक्ष ची परवानगीशिवाय केज नगरपंचायत चा कारभार कसा हाकत आहे!का दलित नगराध्यक्ष हे नामधारी आहेत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत आपला वापर केला म्हणून नाराज आहेत? याचीच चर्चा सध्या केज शहरात मोठ्या चवीने चर्चेत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!