• Sat. Sep 19th, 2026

*बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कॉवत यांची नियुक्ती*

Bybaba maske

Dec 21, 2024

*बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कॉवत यांची नियुक्ती*

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड – प्रचंड वाढलेल्या गुन्हेगारीमुळे राज्यभरात बदनाम झालेल्या बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी आयपीएस अधिकारी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीचा उद्रेक रोखून जनसामान्यामध्ये पोलिसांबद्दल पुन्हा विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान नवनीत कॉवत यांच्या समोर असणार आहे.

विविध अवैध धंद्यांचे माहेरघर ठरलेला बीड जिल्हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात अधिकच बदनाम झाला. वविध गुन्ह्यात पोलिसांचे आरोपिंसोबत असणारे लागेबांधे, काही गुन्ह्यात आदळून आलेला काही पोलिसांचा सहभाग, एकतर्फी गुन्हे दाखल करणे आदी प्रकारामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही. देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील रसातळाला गेलेल्या कायदा सुव्यवस्थेवर सलग तीन दिवस वाढली चर्चा झाली. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी उचलबांगडी केली. त्यांच्या जागी आता आयपीएस अधिकारी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

कोण आहेत नवनीत कॉवत?

नवनीत कॉवत हे २०१७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण झालेल्या नवनीत कॉवत यांनी आयआयटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे नवनीत कॉवत हे तीन वेळेस युपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. नवनीत कॉवत सुरुवातीला ते आयईएस, नंतर आयआरएस आणि त्यानंतर आयपीएस झाले आहेत. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते.

 

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!