• Sat. Sep 19th, 2026

मा.अजित पवार सांत्वन पर देशमुख हत्याकांड झालेल्या परिवारस भेटण्या साठी आले पण गावकऱ्यांनी घोषणा बाजी करून पळवून लावले. धनंजय मुंडे ना मंत्री करू नका हाच आक्रोश.महिला आक्रमक. 

Bybaba maske

Dec 21, 2024

मा.अजित पवार सांत्वन पर देशमुख हत्याकांड झालेल्या परिवारस भेटण्या साठी आले पण गावकऱ्यांनी घोषणा बाजी करून पळवून लावले.

धनंजय मुंडे ना मंत्री करू नका हाच आक्रोश.महिला आक्रमक. 

रोखठोक न्युज वार्ताहर 

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टिकोनातून शासन काम करीत आहे याप्रकरणी दोषी व्यक्तींना फाशी दिली जाईल यासाठी मी स्वतः या प्रकरणात पूर्ण लक्ष देणार आहे अशी ग्वाही देतो असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग येथे देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वन प्रसंगी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मस्साजोग येथे भेट दिली. दिवंगत देशमुख यांची पत्नी, मुलगी तसेच भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी त्यांनी घटनेबाबत चर्चा करून माहिती घेतली व शासन सर्व प्रकारे या प्रकरणात तपास करून देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देईल असे सांगितले. सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे असेही ते म्हणाले.

शासनाच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो असे श्री. पवार म्हणाले. त्यांनी दिवंगत देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.

पोलीस आपल्या पद्धतीने तपास करीत आहेत सोबतच न्यायालयीन चौकशी सुरू असून यात कुठलीही त्रुटी राहणार नाही असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, या घटनेमागे कोणी मास्टरमाईंड असेल तर त्यालाही सोडले जाणार नाही.

यावेळी श्री पवार यांच्या समवेत ज्येष्ठ नेते रमेश आडसकर,डॉ. योगेश क्षीरसागर तसेच आदि उपस्थित होते.

परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांचे कुटुंबिय बोलण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे आम्हांला तुमच्याशी बोलायचे आहे, अशी विनंती गावातील महिलांनी केली. त्यावेळी अजित पवार पळत गाडीकडे गेले. राज्यातील उपमुख्यमंत्री सांत्वन भेटीसाठी येतो, तेव्हा तो पळत जात नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दांत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अजित पवार यांनी येथे येत गावकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. या गंभीर घटनेबाबत ते काहीही बोलले नाहीत. तसेच जनतेशीही त्यांनी संवाद साधला नाही. ते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी अजित पवार यांनी पळ काढला.

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!