भावकीच्या भांडणात मध्यरात्री पडला रक्ताचा सडा, तिघांचा मृत्यू
रोखठोक न्युज वार्ताहर
धाराशिव जिल्ह्याच्या येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथे भावकीच्या वादातून झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू
धाराशिव जिल्ह्याच्या येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथे भावकीच्या वादातून झालेल्या हाणामारीत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
आप्पा काळे, सुनील काळे आणि परमेश्वर काळे असं मयत झालेल्या तिघांची नावं आहेत. सुनील काळे आणि परमेश्वर काळे हे बापलेक आहेत. या हाणामारीत तीन पुरुषांसह एक महिला गंभीर जखमी आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.