• Tue. Sep 22nd, 2026

केज शहरात मटका बुक्कीवर पोलिसांची धाड; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Bybaba maske

Apr 23, 2026

केज शहरात मटका बुक्कीवर पोलिसांची धाड; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

रोखठोक न्यूज वार्ताहर 

शहरातील केज बीड रोड परिसरात मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी २२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादी म्हणून बालासाहेब नरहरी डापकर (वय ४५, नोकरी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज) यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी

1. लहू लक्ष्मण गिरी (रा. समर्थनगर, केज)

2. ईस्माईल ईनामदार (रा. काजळा, ता. केज)

हे दोघे केज बीड रोडच्या उत्तर बाजूस गणेश वडापाय सेंटरसमोरील बाकड्यावर बसून बेकायदेशीरपणे मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी लहू गिरी याच्या अंगझडतीतून विविध नोटांमध्ये एकूण ₹17,080 रोख रक्कम जप्त केली. तसेच मटका जुगारासाठी वापरले जाणारे दोन मोबाईल फोन (Realme 11 Pro 5G व Oppo A5 5G) जप्त करण्यात आले असून त्यांची एकत्रित किंमत अंदाजे 40,000 आहे. अशाप्रकारे एकूण 57,080 चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

चौकशीत आरोपी मटका जुगार “कल्याण, मिलन डे, मिलन नाईट, श्रीदेवी डे, श्रीदेवी नाईट, टाइम बाजार” या नावाने चालवत असल्याचे उघड झाले. तसेच आरोपी लहू गिरी हा १० टक्के कमिशनवर ईस्माईल ईनामदार याला हा व्यवसाय देत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 49(3)(5) तसेच महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

baba maske

Related Post

केसच्या मदतीचे आमिष दाखवत पीएसआय कडून महिलेवर अत्याचाराचा आरोप! रक्षकच झाला भक्षक; वडवणी पोलिस ठाण्यातील ग्रेड पीएसआय गणेश राठोड विरुद्ध गुन्हा, आरोपी फरार
विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!