• Mon. May 25th, 2026

बीड जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडून ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी. केज येथे पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवने च्या जागी शितलकुमार बल्लाळ  

Bybaba maske

May 25, 2026

बीड जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडून ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी.

केज येथे पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवने च्या जागी शितलकुमार बल्लाळ

रोखठोक न्यूज वार्ताहर 

बीड: जिल्हा पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि कामकाजाला गती देण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी रविवारी (दि. २४) जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या व्यापक बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदली प्रक्रियेमध्ये प्रशासकीय कारणांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जांचाही सकारात्मक विचार करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे पोलीस वर्तुळात फेरबदलांचे वारे वाहू लागले असून, सर्व बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या अधिकृत आदेशानुसार बदली झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची नावे, त्यांची सध्याची नेमणूक आणि नवीन नियुक्तीची ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.

पोलीस निरीक्षक (PI) बदल्या –

बीड जिल्हा पोलीस दलातील प्रमुख पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची बीड शहर पोलीस ठाण्यातून केज पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. पाटोदा येथून पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांची बीड शहर पोलीस ठाण्याच्या मुख्य पदावर बदली झाली आहे. नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे आता प्रभारी वाहतूक शाखेची धुरा सोपवण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, होम डीवायएसपी पदावरून पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांची प्रभारी पाटोदा पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच केज येथून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) बदल्या – 

सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. केज येथून सपोनि संदीप मांजरमे यांची प्रभारी युसूफवडगाव पोलीस ठाणे येथे, तर अंबाजोगाई शहर येथून सपोनि राजेंद्र घुगे यांची धारूर येथे बदली झाली आहे. अंबाजोगाई शहर (पिंक पथक) येथून सपोनि जाधवर संतोष महादेव यांची केज पोलीस ठाण्यात, तर गेवराई येथून सपोनि कोटकर सतिष पांडुरंग यांची प्रभारी अंमळनेर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजीनगर पिंक बीड येथून सपोनि लांडगे अतुलकुमार सिताराम यांची गेवराई पोलीस ठाण्यात तर सिरसाळा येथून सपोनि दहिफळे गोरकनाथ बाबासाहेब यांची पिंक पथक बीड येथे नियुक्ती झाली आहे.

याचसोबत अंबाजोगाई ग्रामीण येथून सपोनि जगताप रंगनाथ मुरलीधर यांची शिवाजीनगर बीड येथे, यु. वडगाव येथून सपोनि शेंडगें मच्छिंद्रनाथ गंगाधर यांची पिंक पथक माजलगाव येथे तर धारूर येथून सपोनि वाघमोडे देविदास बाळासाहेब यांची पिंक पथक गेवराई येथे बदली करण्यात आली आहे. पिंपळनेर येथून सपोनि घुगे मधुसूदन रामकृष्ण यांची पिंक पथक अंबाजोगाई येथे, आष्टी येथून सपोनि नरवाडे विजय आनंद यांची प्रभारी पिंपळनेर ठाणे येथे तर माजलगाव शहर येथून सपोनि मुंडे प्रल्हाद परभतराव यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. बीड शहर येथून सपोनि राठोड बाबा भिलू यांची प्रभारी सिरसाळा ठाणे येथे, अंभोरा येथून सपोनि साळवे मंगेश भागवत यांची प्रभारी नेकनूर पोलीस ठाणे येथे तर पेठ बीड येथून सपोनि उबाळे नित्यानंद नाथा यांची अंबाजोगाई शहर येथे बदली करण्यात आली आहे. माजलगाव ग्रामीण येथून सपोनि सोनवळे देविदास उत्तमराव यांची आष्टी पोलीस ठाण्यात, आष्टी येथून सपोनि हिंगे विक्रांत दिलीप यांची प्रभारी अंभोरा पोलीस ठाणे येथे, गेवराई येथून सपोनि लंके दिपक दत्तात्रय यांची केज पोलीस ठाण्यात आणि पिंक पथक गेवराई येथून सपोनि गडवे राजेश रंगनाथ यांची प्रभारी शिरूर पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक (PSI) बदल्या –

पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्येही अंतर्गत फेरबदल करण्यात आले आहेत. बर्दापूर येथून पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांची अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. टी.ए.सी बीड येथून पोउपनि औटे शेखर बळीराम यांची स्थानिक गुन्हे शाखेत, तर संभाजीनगर परळी येथून पोउपनि शिंदे अनिल तुकाराम यांची अंबाजोगाई शहर ठाण्यात बदली झाली आहे. माजलगाव शहर येथून पोउपनि माकणे केरबा बाबुराव यांची एसडीपीओ माजलगाव रीडर म्हणून तर तलवडा येथून पोउपनि कोळी स्वप्निल दिलीप यांची माजलगाव शहर ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. बीड ग्रामीण येथून पोउपनि कुकलारे संजय रामराव यांची वाहतूक शाखेत, नेकनूर येथून पोउपनि रोकडे अप्पासाहेब रमेशराव यांची गेवराई पोलीस ठाण्यात तर आष्टी येथून पोउपनि शिंदे श्रीकृष्ण दत्तु यांची अंभोरा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

 

याशिवाय पिंपळनेर येथून पोउपनि गोलवाल अर्जुन चैनसिंग यांची एसडीपीओ बीड रीडर म्हणून नियुक्ती झाली आहे. पो.नि.क बीड येथे कार्यरत असलेले पोउपनि भालेराव प्रदिप मोतिराम यांना सीआरओ मध्ये १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. बीड ग्रामीण येथून पोउपनि काकरवाल नितीन खुशालसिंग यांची नेकनूर पोलीस ठाण्यात, वडवणी येथून पोउपनि राठोड राजु धनसिंग यांची तलवडा पोलीस ठाण्यात, शिरूर कासार येथून पोउपनि खांडखुळे देविदास बाबुआप्पा यांची डीएसबी शाखेत तर सिरसाळा येथून पोउपनि जाधव आनंद बब्रुवान यांची शिरूर कासार पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. सायबर पोलीस ठाणे बीड येथील महिला पोउपनि लहाणे स्वाती नाना यांना त्याच सायबर पोलीस ठाण्यात १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!