• Tue. Sep 22nd, 2026

कानडी रोडकडे दुर्लक्ष? नागरिकांचा संताप; पुढाऱ्यांवर सवाल यश कन्स्ट्रक्शन कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले?

Bybaba maske

Apr 22, 2026

कानडी रोडकडे दुर्लक्ष? नागरिकांचा संताप; पुढाऱ्यांवर सवाल

यश कन्स्ट्रक्शन कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले?

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज शहरात अलीकडे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे  झाल्याचे चित्र दिसत असताना, शहरातील महत्त्वाचा मानला जाणारा कानडी रोड मात्र दुर्लक्षित राहिल्याची तीव्र भावना नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या भागात कोचिंग क्लासेस, दवाखाने, बँका तसेच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असूनही रस्त्याची अवस्था समाधानकारक नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिकांच्या मते, यश कन्स्ट्रक्शन कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः शहरातील इतर भागांमध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते झाले असताना, कानडी रोडवर अन्याय झाल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.

दरम्यान, या विषयावर काही नागरिकांनी आंदोलनाचा प्रयत्न केला असला तरी त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. आंदोलन करणाऱ्यांना कामाच्या तांत्रिक बाबींचा पुरेसा अभ्यास नसल्याचीही चर्चा आहे.

मेन रोडच्या उत्तर भागातील क्रांतीनगर, समर्थनगर आणि वकीलवाडी परिसरात अनेक स्थानिक नेते वास्तव्यास असूनही या भागातील प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. नागरिकांच्या मते, या भागातील पुढाऱ्यांनी आपल्या भागातील लोकांच्या अडचणींकडे पाठ फिरवली असून फक्त स्वार्थी राजकारण केल्याची टीका होत आहे.

विशेष म्हणजे, वार्ड क्रमांक 1 चे नगरसेवक अझरभाई इनामदार, वार्ड क्रमांक 3 चे माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील तसेच वार्ड क्रमांक 4 मधील सत्ताधारी गटाशी संबंधित नगरसेवक अंधारे यांसारखे प्रभावी नेते असतानाही नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे.

कानडी रोड हा केज शहराचा महत्त्वाचा आणि सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असूनही त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.

baba maske

Related Post

केसच्या मदतीचे आमिष दाखवत पीएसआय कडून महिलेवर अत्याचाराचा आरोप! रक्षकच झाला भक्षक; वडवणी पोलिस ठाण्यातील ग्रेड पीएसआय गणेश राठोड विरुद्ध गुन्हा, आरोपी फरार
विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!