जातीयतेढ निर्माण करणाऱ्यांना परळी येथील सुनील फड व केज तालुक्यातील अमोल शेप यांना पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांचा दणका.
रोखठोक न्युज वार्ताहर
संतोष देशमुख हत्या प्रकरणी काही टवाळखोर व्यक्ती सोशल मिडीयावर जातीय तेढ निर्माण होईल अशी पोस्ट करत होते त्यांची दखल घेत त्यांच्या वर दिनांक.17/01/2025 रोजी सुनील फड, रा.परळी, अमोल शेप, रा.लाडेवडगाव ता.केज यांनी फेसबुक सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केली व त्यांच्या वर कमेंट करून प्रसार माध्यमावर प्रसारित केल्याने वरील दोन व्यक्ती विरुद्ध पोलीस स्टेशन केज येथे गुरन.28/2025 कलम 196, 353(2), 356(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अमोल शेप हा लोकसभे पासुन आपल्या व्यक्तिगत फेसबुक वर दोन जातीय तणाव होईल अश्या पोस्ट करत आहे.लोकसभेत त्याच्या वर प्रशोभीत पोस्ट केल्याने गुन्हा दाखल झाला होता व त्यास अटक ही झाली होती. अटक झाल्यानंतर तो पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता पण सथर्क पोलीसांनी त्याला लगेच अटक केले.त्यानंतर हा त्याच्या वर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
तरी कोणीही सोशल मीडियावर कोणीही जातीय तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह पोस्ट किंवा कमेंट करू नये किंवा कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो प्रसारित करू नये असे केज पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या कडून आवाहन करण्यात आले आहे.