पोलीस असल्याचे सांगून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविले,
रोखठोक न्युज वार्ताहर
आम्ही पोलीस असून तुमच्या गळ्यातीलसोन्याचे दागिने काढून ठेवा असे म्हणून महिलेला दागिने काढण्यास सांगून हातचलाखीकरून १लाख २० हजार रुपये किमतीचे मिनी गंठण व कानातील झुंबर हे दागिने घेवून पोबारा केला आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ११-०० वाजण्याच्या सुमारास रामकुंवर उर्फ अनिता शंकर राऊत वय ५० वर्ष ही महीला केज- कळंब रोड लगत असलेल्या साईनगर येथील धुणी-भांड्याचे काम आटोपून विठाई पुरमकडे जात असताना लोहीया यांचे हार्डवेअर च्या दुकानाच्या बाजुने जात असताना समोर एक व्यक्ती ऊभा होता. त्याच वेळी अचानक पाठीमागुन मोटार सायकल वरून एक व्यक्ती आला.त्याने डोक्याला हेल्मेट घातले होते.त्याने रामकुंवर उर्फ अनिता हिच्या जवळ गाडी ऊभी करून म्हणाला की,शितल शिंदे यांचे घर कोठे आहे ? त्यांची पेपर मध्ये बातमी आलेली आहे.मी पोलीस आहे.असे म्हणुन खाकी ड्रेस असलेले ओळखपत्र दाखवले. त्या नंतर तो म्हणाला की,तुम्ही तुमच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागीने काढुन बॅगमध्ये ठेवा.बायकांनी असे दागिने घालुन फिरायचे नसते.आमचे साहेब भेट दयायला येत आहेत असे म्हणाल्याने त्या महिलेने कानातील झुंबर काढून पर्स मध्ये ठेवले.त्यानंतर त्याने गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण काढण्यास सांगितले.ते लवकर न निघल्याने त्यानेगळ्यातील मिनीगंठण काढुन पर्समध्ये काढून टाकल्या सारखे केले.नंतर रामकुंवर उर्फ अनिता यांनी पर्स चेक केली असता त्यामध्ये बनावट गंठण दिसले. त्यामुळे रामकुंवर उर्फ अनिता यांनी त्याची मोटार सायकल धरण्याचा प्रयत्न केला.मात्र दोघे अनोळखी ईसम त्यांची मोटार सायकल क्रमांक २८२९ यावर बसुन केज च्या दिशेने निघुन गेले.
रामकुंवर उर्फ अनिता राऊत यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात दोन अज्ञात ठकसेना विरुद्ध गु.र.नं. ३३/२०२५ भा.न्या.सं. २०४,३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी हे पुढील तपास करीत आहेत.