वाल्मीक कराड यांनी आपला जामीन अर्ज कोर्टातून वापस घेतला!
रोखठोक न्युज वार्ताहर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणाला आज नाट्यमय वळण मिळाले. संशयित आरोपी वाल्मीक कराड याच्या वकीलाने सादर केलेला जामीन अर्ज आज मागे घेतला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट आणि मकोका अंतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी वाल्मीक कराड याच्यावर आवादा एनर्जी या पवन चक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
खंडणी प्रकरणीदेखील त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. खंडणी प्रकरणी आज (दि.२३) त्याच्या जामीन अर्जावर केज न्यायालयात सुनावणी होणार होती. आज सकाळी ११.३० वाजता सरकारी वकील अॅड. जितेंद्र शिंदे, आरोपींचे वकील अॅड. अशोक कवडे आणि सीआयडीचे तपास अधिकारी डीवायएसपी अनि गुजर हे सर्वजण केज येथील ‘ क’ स्तर दिवाणी न्यायालया मुख्यन्यायाधीश एस. व्ही. पावसकर यांच्या न्यायालयात हजर झाले. त्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी सुरू होण्यापूर्वीच संशयित आरोपीचे वकील अॅड. अशोक कवडे यांनी
न्यायालयासमोर जामीन अर्ज माघारी घेण्यासंबंधी विनंती अर्ज सादर केला.
त्यामुळे वाल्मीक कराड याला खंडणी प्रकरणी जामीन मिळतो की नाही? अशी जी चर्चा सुरू होती. ती आता थांबली आहे.
‘तारीख पे तारीख’ला ब्रेक
वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जावर १८ जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. त्यानंतर त्याच्या वकीलाची तब्बेत बरी नसल्याने पुढील सुनावणी २० जानेवारी रोजी ठेवण्यात आली होती. पण २० जानेवारी रोजीदेखील आरोपींच्या वकीलाने पुढील तारखेच् केली. त्यामुळे जामीन अर्जावर २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. पण आता वाल्मीक कराड याचा जामीनाचा अर्जच मागे घेण्यात आला आहे.