• Sun. May 3rd, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील पोलीस निरिक्षक व निलंबित पोलीस उपनिरिक्षक जज्ज बरोबरचे रंग उधळणारे फोटो व्हायरल

Bybaba maske

Mar 14, 2025

संतोष देशमुख प्रकरणातील पोलीस निरिक्षक व निलंबित पोलीस उपनिरिक्षक जज्ज बरोबरचे रंग उधळणारे फोटो व्हायरल.

रोखठोक न्युज वार्ताहर 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासा संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोंमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश याच प्रकरणात निलंबित झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. मात्र हे फोटो आधी तपासा आणि खात्री करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

X वर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, “संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील आणि याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन, हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत. पण कोणाबरोबर? संतोष देशमुख हत्याकांडाची सूनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिस सुधिर भाजीपाले यांच्यासोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत.”, असं त्या आपल्या पोस्टमध्ये म्हटल्या आहेत.

दमानिया यांनी पुढं म्हटलं आहे की, “आरोपीला वाचणारे हे निंलबित आधिकारी यांच्यासोबत केस चालू असताना न्यायाधीश होळी खेळत असतील तर, हे खूप चुकीचे आहे.”, असंही त्या म्हटल्या आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!