• Sun. Sep 20th, 2026

अखेर विक्रम मुंडे, अतूल मुंडे बापलेकाविरुध्द गुन्हा दाखल. विजयकांत मुंडेचे नाव नाही! जिल्हाधिकाऱ्यांची झापाझापी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा, त्यानंतर हालले प्रशासन

Bybaba maske

Mar 18, 2025

अखेर विक्रम मुंडे, अतूल मुंडे बापलेकाविरुध्द गुन्हा दाखल.

विजयकांत मुंडेचे नाव नाही!

जिल्हाधिकाऱ्यांची झापाझापी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा, त्यानंतर हालले प्रशासन

रोखठोक न्युज वार्ताहर 

जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली झापाझापी आणि विधीमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनंतर अखेर शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विक्रम मुंडे आणि त्याचा मुलगा अतूल मुंडेसह इतरांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील जिल्हा परिषदेचा माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे आणि त्याच कुटूंबातील अनेकांचा भरणा भरणा असलेल्या रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठानच्या आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. संस्थाचालक विक्रम मुंडेने आपल्याला

फाशी घ्यायला सांगितले असे धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता. घटनेला बराच काळ उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने रविवारी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पोलीसांना झापले होते तर सोमवारी विधीमंडळातही हा विषय चर्चेला आला होता. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर सोमवारी सायंकाळी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीसात तक्रार दिली. त्यावरून पोलीसांनी विक्रम मुंडे, अतूल मुंडे आणि इतरांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आंतापर्यंत गुन्हा दाखल होण्यापासून वाचलेल्या मुंडे पितापुत्रांची अटक आता कधी होते याची प्रतिक्षा जिल्ह्याला आहे.

चौकट…

विजयकांत मुंडेचे नाव नाही

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत विक्रम मुंडे, अतूल मुंडे आणि इतर असा उल्लेख करण्यात आला आहे. वस्तुतः धनंजय नागरगोजे यांच्या पोस्टमध्ये विजयकांत मुंडेचा नावानिशी उल्लेख करण्यात आलेला आहे मग तक्रारीत विजयकांत मुंडे असा नाम्मोलेख का झाला नाही? इतर या सदराखाली पोलीस कारवाई करणार आहेत का? विजयकांत मुंडेचे नाव लिहायला कोणाचे हात थरथरले? या प्रश्नाची उत्तरे मिळायला तयार नाहीत. भारतीय संग्राम परिषदेकडून जिल्हापरिषद सदस्य झालेल्या विजयकांत मुंडेने नंतर भाजपशी घरोबा केला होता, त्यामुळे त्याचे नाव थेट घेणे टाळले आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!