• Sat. Apr 18th, 2026

अंबाजोगाई ते आडस रोडवर 14 टायरी ट्रक पुलात घसरली दुचाकीस्वाराच्या गाडीला साईड ग्लास नसल्यामुळे असे अपघात घडू लागले 

Bybaba maske

May 22, 2025

अंबाजोगाई ते आडस रोडवर 14 टायरी ट्रक पुलात घसरली

दुचाकीस्वाराच्या गाडीला साईड ग्लास नसल्यामुळे असे अपघात घडू लागले 

अंबाजोगाई प्रतिनिधी 

 अंबाजोगाई ते आडस रोडवर चनई गावा जवळ दुचाकी ला वाचवण्याच्य प्रयत्नामुळे ट्रक रोडच्या बाजूला घसरून रोड नजीकच्या पुलात अर्धी आणि रोडवर अर्धी या अपघाता मध्ये कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही परंतु या मार्गावर दि 14 तरखेला दुचाकीस्वाराला वाचण्याच्या प्रयत्नांमुळे गाडीवरील ड्रायव्हरचा ताबा सुटला ईरटीका गाडी चा भीषण अपघात झाला यामध्ये तीन ठार तर चार जखमी झाले असे प्रकार घडत आहेत या मागचे मुख्य कारण म्हणजे दुचाकी गाडीला साईड ग्लास न बसवल्यामुळे यासारखे अपघात होत आहेत दुचाकीला कंपनी दोन्ही साईड ग्लास देते पण आज कालची फॅशन झाली आहे दुचाकी गाडीचे दोन्ही साईड ग्लास काढून टाकने कानामध्ये हेडफोन असल्यामुळे मागच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज दुचाकीस्वाराला येत नाही आशा दुचाकी स्वरामुळे भीषण अपघात होत आहेत पोलीस प्रशासनाने साईड ग्लास नसलेल्या दुचाकी स्वरावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे असा सवाल जनतेतून होत आहे रोडच्या बाजूला घसरलेला ट्रक बाजूला काढून रोड मोकळा करण्यासाठी पाच तासाचा कालावधी गेला यामुळे या रोडवरती ये जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!