अंबाजोगाईत बनावट खव्याच्या मिठाई विक्रीला.
सणासुदीच्या काळात सरास बनावट मिठाई.
अन्न व औषध प्रशासन चे दुर्लक्ष.
रोखठोक न्यूज वार्ताहर
अंबाजोगाई शहरात व मोरेवाडी येथे व यशवंतराव चव्हाण चौकातील स्वीट होम मध्ये खव्याच्या पदार्था मध्ये बनावट खव्वा वापरून, पेढे,बर्फी असे खवा युक्त पदार्थ हे बनावट खव्या पासून बनवल्याचे दिसून येत आहेत.तसेच मिठाई सुशोषीत दिसावी म्हणून त्यावर बनावट चांदी वर्क केले आहे.बनावट खव्या पासून मिठाई बनवल्याने मिठाई खाताना याची चव वेगळी व गंध हीन आहे तसेच खाल्यानंतर ओठांवर एक पावडर सारखे केमिकल आढळून येत आहे.तसेच मिठाई खरेदी केलेले मिठाई चे बाॅक्स हे त्या स्वीट होम च्या नावाचे असले पाहिजेत पण ते बाॅक्स स्वीट होम च्या नावाचे नसून बगर नावाचे आहेत. तसेच मिठाई कधी एक्स्पायर होईल त्याची तारीख सुद्धा न दुकानात किंवा मिठाई बाॅक्स वर आढळून येत नाही त्या मुळे मिठाई कधी बनवली व कुठ पर्यंत चालू शकते हे कोठेच समजून येत नाही.
न्यालयाचे व महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन कडून तसे स्पष्ट निर्देश असताना याचे कोठेच पालन होत नाही.तरीपण शहरात व मोरेवाडी परिसरातील यशवंतराव चव्हाण चौकातील स्वीट होम वर अन्न व औषध प्रशासनाने एकदा सर्व मिठायांची पडताळणी करावी अशी मागणी होत आहे.कमी पैशात जास्त नफा मिळवण्या साठी स्वीट होम मालक केमिकल युक्त खवा वापरून मिठाई तयार करत असल्याने.मिठाई चे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत,त्यामुळेच या सर्व स्वीट होमची पडताळणी होणे गरजेच आहे. कारण हे स्वीट होम वाले जनतेच्या आरोग्य व जिवीताशी खेळत असल्याच दिसून येत आहे.सध्या गणेश उत्सव,गौराई चे सण आहेत त्यामुळे मोठ्याप्रमाणावर मिठाई विक्री होत असताना बनावट मिठाई विक्री होत आहे या कडे अन्न व औषध प्रशासन यांनी लक्ष देणे गरजेच झाल आहे.
