• Sat. Apr 25th, 2026

महावितरणच्या महिला अभियंत्यास न्याय मिळेल का? तोतये पत्रकारा कडून मुलास धोका! बोगस,बनावटी पत्रकारांवर कारवाई कधी?

Bybaba maske

Sep 4, 2025

महावितरणच्या महिला अभियंत्यास न्याय मिळेल का?

तोतये पत्रकारा कडून मुलास धोका!

बोगस,बनावटी पत्रकारांवर कारवाई कधी?

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज महावितरण महिला अभियंता शितल सय्यद यांनी १ ऑगस्ट 2025 रोजी केज पोलीस ठाण्यात अर्ज केला आही की मी मुबशीर खतीब यांना चोरीची लाईट वीज वापरताना आढळून आल्या मुळे मी त्यांना २३४५७०(दो लाख चोवीस हजारपाचशे सत्तर) रूपयांचा दंड केला त्या मुळे मुबशीर खतीब व तात्या गवळी यांनी बनावट न्यूज पेपर लिंक च्या अधारे माझी बदनामी केली आहे. यामुळे माझ्या कुटुंबावर आणि सहाका-यांवरही ही नकारात्मक परिणाम होत आहे.

 मुबशीर खतिब व तात्या गवळी हे दोघेही सतत माझ्या कार्यालयाच्या व घराच्या आजु बाजुला चकरा मारत आहे व तसेच मी एक फील्ड अधिकारी असल्याने सतत रात्री बेरात्री एकटी लाईन फॉल्ट व इतर कामासाठी फिरत असते. तरी पण मला या दोघांकडुन जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मी केज तालुक्यात नविन असुन माझे कुठलेही नाते वाईक नाही माझा १८ वर्षाचा मुलगा एकटा टीव्हीशनला जातो व तसेच हे दोघेही बनावटी पत्रकार माझा काहीही गुन्हा नसतांना मला खोटया आरोपांमध्ये फसवण्याचा प्रयत्न करून शकतात, तर मला व माझ्या मुलाला काही जीवीतहानीही पोहचु शकतात. तरी माझी आपणास विनंती आहे की, सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून या बनावटी पत्रकार मुबशीर खतिब व तात्या गवळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी महावितरण अभियंता शितल सय्यद यांनी पोलीस ठाण्यात दिली असून ही आज घडी पर्यंत पोलीस निरीक्षक यांनी या बोगस पत्रकारांवर कुठलीच कारवाई केल्याचे आढळून येत नाही.त्यामुळेच अश्या बोगस सुपारीबाज पत्रकारांचे फावत आहे तरी या मुबशीर खतीब व तात्या गवळी यांच्या वर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी आता जनतेतून च होऊ लागली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!