• Sun. Sep 20th, 2026

केज तालुक्यात सर्वच प्रकारचे अवैध धंदे उफाळी मारू लागले डिवायएसपी साहेब यंत्रणेवर शिस्तीचा दंडूका फिरवण्याची गरज

Bybaba maske

Jan 1, 2026

केज तालुक्यात सर्वच प्रकारचे अवैध धंदे उफाळी मारू लागले डिवायएसपी साहेब यंत्रणेवर शिस्तीचा दंडूका फिरवण्याची गरज

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज तालुक्याला काही कठोर प्रशासक व कर्तव्यनिष्ठ पोलीस उपअधीक्षक लाभले. परंतु -त्यांच्या काळात देखील तालुक्यात अवैध धंदे कायम बंद होऊ शकले नाहीत, सध्याच्या पोलिस उपअधीक्षक दरारा गेलेला नाही. यातच दिवाळी अगोदर काही अवैध धंद्यावर कारवाया झाल्या. अवैध धंदे चालकांनी भिती घेतली. परंतु दिवाळी झाल्यानंतर जणू फटाके फोडून अवैध धंदे चालकांनी आपल्या अवैध धंद्याला उफाळी मारणे चालवले. विशेष करून केज शहर,युसुफवडगाव पोलीस ठाण्या अंतर्गत नांदूरघाट चौकी अंतर्गत अशा महत्त्वाच्या पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात मटका, गुटका जुगार अशा प्रकारचे अवैध धंदे जोमात सुरू झाले. पोलीस उपअधीक्षक व्यंकटराम यांनी सुरुवातीपासून कर्तव्यनिष्ठता व कठोर प्रशासक म्हणून कामाच्या दर्जातून दाखवून दिलं आहे. असं असताना काही पोलीस अशा अवैध धंद्यावर कसं काय दुर्लक्ष करीत आहे. तेव्हा साहेब आपल्या काळात प्रशासनाची प्रतिमा उज्वल ठेवण्यासाठी आपल्या यंत्रणेवर शिस्तीचा दंडोका फिरवा अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून होऊ लागली आहे.

केज तालुक्यातील ९०% गावांमध्ये कोणते ना कोणते अवैध धंदे चालतात हे नवीन नाही परंतु ठाण्याचा किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी आपला सक्षमपणा कायम ठेवत असेल तर हे धंदे कायम बंद जरी नाही झाले तरी चोरून चोरून थोडे बहुत चालतच असतात परंतु पोलीस यंत्रणेचा यांच्यावर चांगला दरारा असतो असा असताना अवैध दंड चालकांना कसल्याही प्रकारचा पोलिसांचा दरारा राहिला नाही असे स्पष्ट मत सामान्य जनतेमधून व्यक्त केले जाऊ लागले आहे. एखाद्या उच्च पदावर किंवा ठाणे प्रमुख म्हणून आलेला पोलीस अधिकारी सुरुवातीला चार दोन धडाकेबाज कारवाया करतो आणि पुन्हा मात्र अशा अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष राहते. मग या कारवाया कशासाठी? असा प्रश्न देखील केला जाऊ लागला आहे.तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत या ठाण्याच्य कार्यक्षेत्रात अवैध धंदे चालकांची जल्लोष स्पर्धा लागलेली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. युसुफवडगाव नांदूरघाट अश्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चालत असलेल्या अवैध धंद्याकडे तेथील प्रभारी अधिकारी कठोर पावले उचलायला तयार नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे केज तालुक्यातील युसुफवडगाव व नांदूरघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाटमोठ्या प्रमाणात वाढला. अवैध दारू मटका गुटखा जोरात चालू आहेत. दारूमुळे घरात कलह वाढत असून उघडपणने कुठेही सहजरित्या दारू मिळत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित बिट अंमलदार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. युसुफवडगाव पोलीस स्टेशन यांच्या दुर्लक्षामुळे परिसरात अवैधे धंदे ओपन चालू आहेत या अवैध धंद्यानी अनेकांचे घर उद्ध्वस्त केले आहे तरीही युसुफवडगाव पोलीस स्टेशन झोपेत असल्याचे दिसून येत आहे काही दिवसापूर्वी केज पोलीस स्टेशनला डी वाय एस पी म्हणून पंकज कुमावत यांनी चार्ज घेतला होता यांनी अवैध धंद्यांना चांगला चाप बसला होता त्यानंतर कुमावत सरांची यांची बदली होताच पुन्हा खुलेआम अवैद्य धंदे चालू झाले याकडे कोणाचेही लक्ष नाही गावात मटका घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता नागरिकांतून केल्या जात आहे. तर मटका घेणाऱ्याचे मनसुबे आता उंचवले असून कोणालाही ते जुमानत नाही. एका रुपयाला ९० रुपये देणारा हा व्यवसाय लपून, छपून चालत होता. पण ओपन टू क्लोजमध्ये खेळला जाणारा हा एक प्रकारचा जुगार संसार उद्धवस्त करणारा ठरत आहे. मागील काही महिन्यांपासून गावात एका घरात या व्यवसायाची खुलेआम स‌ट्टा पिढी बनविली जात आहे. बीड जिल्ह्याला आतापर्यंत जे काही पोलीस उपअधीक्षक लाभले त्यापैकी दोन-तीन पोलीस अधीक्षकांच्या काळात अवैध धदे चालकावर वचक होता. अतिशय गुप्तपणे एखादा दुसरा व्यक्ती हा धंदा करीत असे. आणि समजल्यानंतर केलेल्या कारवाईत पोलीस लोक त्याचा कूबड मोकळ करीत असतात. सध्याच्या काळात कायदेशीर पोलिसांना काही एक काढता येत नसलं तरी ज्या पद्धतीने अवैधव गुन्हेगारीतून सर्वसामान्य जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या व्यक्तीवर जसे मकोकासारख्या कारवाया करण्याचं पोलीस प्रशासनानं अव्यहात चालू ठेवला आहे. तसं अशा प्रकारच्या सतत धडाकेबाज कारवाया चालवल्या तर खालच्या पोलीस अधिकाऱ्यांनी कितीही दुर्लक्ष केलं तरी अशा कारवायाच्या भीतीने अवैध धंदे चालकांचे पाऊल या धंद्याकडे वळणार नाही. पोलीस उपअधीक्षक गावात साहेब कठोर प्रशासक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून गणले गेले आहेत त्यांचा हा बाणा त्यांनी कायम ठेवण्यासाठी आपल्या प्रशासनातील कर्तव्य विसरणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यावर शिस्तीचा दंडूका फिरवावा अशी रास्त मागणी जनतेमधून होलागली आहे.

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!