• Sun. Sep 20th, 2026

आंतरजातीय लग्न केलेल्या मुलीच्या आई-वडिलांची जावयाच्या आई-वडीलांना मारहाण

Bybaba maske

Jan 4, 2026

आंतरजातीय लग्न केलेल्या मुलीच्या आई-वडिलांची जावयाच्या आई-वडीलांना मारहाण

बातमीदारः गौतम बचुटे केज 

आंतर जातीय लग्न केलेल्या मुलीच्या आई-वडिलांनी जावयाच्या आई-बडीलांना मारहाण करून जखमी केले आहे. केज तालुक्यातील वाघेबाभळगाव येथील शिवाजी वाघ यांचा मुलगा शरद वाघ याने विलास ठोंबरे याची मुलगी वैष्णवी हिच्या सोबत मागील तीन वर्षा पूर्वी आंतरजातीय विवाह केलेला आहे. वैष्णवी व शरद वाघ हे दोघे बीड येथे राहतात. दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ९:०० च्या सुमारास विजया वाघ व शिवाजी वाघ हे दोघे पती-पत्नी त्यांच्या गावातील बाळु शेलार यांचे शेतात कांद्याचे रोप आणण्यासाठी जात होते. त्याच रस्त्याने जात असलेले त्यांच्या सुन वैष्णवी हिचे वडील विलास यादवराव ठोंबरे व आई जयमाला विलास ठोंबरे व दोघे अनोळखी त्यांना पाहुन त्यांच्या जवळ गेले. विजया व शिवाजी बाध हे कांद्याचे रोप उपटत असतांना विलास ठोंबरे याने त्यांना शिवीगाळ करून त्याने लोखंडी गज विजया वाघ यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. तर जयमाला ठोंबरे हिने विळ्याने मारहाण करून गळ्यातील सोन्याची पोत तोडली. शिवाजी वाघ हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांच्या सोबतच्या दोन इसमांनी त्यांना काठीने मारून गंभीर जखमी केले. त्या नंतर जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र नांदूरघाट येथे प्रथमोपचार करून जिल्हा रुग्णालय बीड येथे संदर्भसेवेसाठी हलविले. तिथून पुढे त्यांना बीड येथे लाईफलाईन हॉस्पीटल मध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले. त्या नंतर विजया बाघ यांच्या तक्रारी बरून त्यांची सून वैष्णवी हिचे आई-वडील जयमाला ठोंबरे, विलास ठोंबरे आणि दोन अनोळखी व्यक्ती या चौघा विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ०५/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८(२), ३५१(२), ३५२, ३(५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर हे या प्रकरणी तपास करीत आहेत.

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!