• Sun. Sep 20th, 2026

अहोऽऽऽ तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक साहेब तुमच्या दारात अतिक्रमण होतय तरी तुम्ही गप्प कसे? ऐन तहसील, पोलीस स्टेशन च्या दारात अतिक्रमण. टपऱ्यांचे गाव अशी ओळख ५० वर्षा नंतर ही कायम!!

Bybaba maske

Jan 5, 2026

अहोऽऽऽ तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक साहेब तुमच्या दारात अतिक्रमण होतय तरी तुम्ही गप्प कसे?

ऐन तहसील, पोलीस स्टेशन च्या दारात अतिक्रमण.

टपऱ्यांचे गाव अशी ओळख ५० वर्षा नंतर ही कायम!!

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज शहराची बक्काल अवस्था केल्या नंतर ही शांत न बसणारे अतिक्रमण धारकांनी चक्क तहसील गेटलाच वेढा टाकला आहे ते ही तहसीलदारांच्या व पोलिस निरीक्षकांच्या नाकावर टिच्चून!

केज शहराला टपऱ्यांचे गाव अशी ओळख होती ती आज ५० वर्षा नंतर ही तसीच कायम आहे ते फक्त तालुक्यातील अधिकाऱ्यांमुळे पाठी मागे याच तहसीलदार राकेश गिड्डे व पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत यांनी अतिक्रमण काढून शहराचा श्वास मोकळा केला होता,जोपर्यंत पंकज कुमावत होते तो पर्यंत केज शहरात अतिक्रमण झाले नाही त्यांची बदली झाली व शहरातून जाणाऱ्या महामार्गावर पुनश्च अतिक्रमण झाले पण त्यानंतर कुठल्याच अधिकाऱ्यांने याच्या कडे लक्ष न दिल्याने आज शहरातून चालता येत नाही. जयभवानी चौका,मंगळवार पेठ, छत्रपती शिवाजीमहाराज चौक, कानडी रोड अश्या गजबजलेल्या ठिकाणी अतिक्रमण धारकांनी मोठ्याप्रमाणावर अतिक्रमण केल्याने जनतेला जीव मुठीत घेऊन चालावे लागते ऐवढी परिस्थिती वाईट आहे.अगोदरच रस्ता बनवणाऱ्या एचपीएम कंपनीकडून रस्त्या पेक्षा नाली उंच केल्याने फुटपाथ राहीला नाही त्यात हातगाडीवर धारक फळ विक्रेत्यांकडून फुटपाथ वर अतिक्रमण केले आहे.शहरात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रस्त्यावर वाहन पार्किंग करण्या शिवाय गत्यंतर राहीले नाहे त्या मुळे रोज वाहतूक कोंडीची आता शहराला सवय लागली आहे. या कडे नगरपंचायत,तहसील पोलीस  प्रशासन दुर्लक्ष करत आहेत.

व्यापारी संकुला साठी फलोत्पादन ची जागा नगरपंचायत ला मिळाली आहे पण अजून नगरपंचायत ने या बाबत कुठलेच पाऊले उचलल्याचे दिसून येत नाही त्यामुळेच व्यापारी संकुलाचा प्रश्न तसाच रेंगाळत आहे त्यामुळेच शहरात वाहतूकीचे प्रश्न निर्माण होत आहे त्या साठी नगरपंचायत दोषी असल्याचे आता जनतेतून उघड पणे बोलले जात आहे.

जर नगरपंचायत ने व पोलिसांनी संयुक्त फलोत्पादनाच्या जागेत पार्किंग साठी जागा दिली तर शहरातील वाहतूक पार्किंग चा प्रश्न मिटेल पण नगरपंचायतचे या गोष्टींत रस दिसून येत नाही त्यामुळेच तहसीलदार साहेबांकडून या विषयावर गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेच झाल आहे.

तहसीलदार साहेबांकडून कमीत कमी तहसील कार्यालयाच्या दारावर( नाकावरच)अतिक्रमण काढून सजगता दाखवावी तसेच शहरातील रस्ते वाहतूकीस व नागरिकांना चालण्या साठी रिकामे  करावेत असे आता जनतेतून बोलले जात आहे

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!