• Sun. Sep 20th, 2026

इन्फंट इंडिया सोबत जागवल्या कलाकथीत आशाबाई बचुटे यांच्या स्मृती 

Bybaba maske

Jan 5, 2026

इन्फंट इंडिया सोबत जागवल्या कलाकथीत आशाबाई बचुटे यांच्या स्मृती 

रोखठोक न्यूज 

गौतम बचुटे/केज :- आपल्या दिवंगत मातोश्रीच्या स्मृती दिन हा आनंद ग्राम मधील अनाथ मुलांच्या सोबत घालवून त्यांच्या सोबत एकत्र भोजन करून डॉ. आकाश बचुटे, डॉ विवेक बचुटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मातोश्रीसह इन्फंट मधील सर्व अनाथांचा आई संध्याताई बारगजे यांचे वडील गणपती (दादा) चाटे यांना श्रध्दांजली अर्पण केली. 

प्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. आकाश बचुटे, दंत चिकित्सक डी. विवेक बचुटे यांच्या मातोश्रीच्या पुण्यस्मरण दिना निमित्त बचुटे कुटुंबियांनी सौ. संध्याताई बारगजे आणि दत्ता बारगजे यांच्या पाली येथील एच आय व्ही बाधितांसाठी चालवित असलेल्या आनंदग्राम येथील इन्फंट इंडियाच्या अनाथ विद्यार्थ्या सोबत सर्व सर्वांनी एकत्रित जेवण करून आईला श्रद्धांजली अर्पण केली. तसेच इन्फंट मधील अनाथांच्या आई सौ. संध्याताई बारगजे यांचे वडील आणि दत्ता बारगजे यांचे सासरे गणपती (दादा) चाटे यांचे दि.२४ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाल्या नंतर चाटे आणि बारगजे कुटुंबियांनी त्यांचे पार्थिव स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात देहदान केले. वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात डॉक्टर यांना शिक्षण घेता यावे या उदात्त हेतून त्याने केलेले कार्य हे समाजाला दिशा दर्शक आहे.

या वेळी त्यांच्या कुटुंबातील सेवानिवृत्त ऑनररी कॅप्टन रावसाहेब बचुटे, गौतम बचुटे, अशोक बचुटे, सौ. संगीता बचुटे, सौ दीक्षा बचुटे, रितेश बचुटे, कु. खुशी, कु. आशू 

________________________________

दिवंगत आशाबाई बचुटे आदर्श माता :- आपल्या दोन्ही मुलांना वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आणि सर्व कुटुंबांना माया आणि प्रेमाच्या धाग्याने जोडणाऱ्या कालकथीत आशाबाई बचुटे या आदर्श माता म्हणून त्यांचा अभिमान आहे. तर मागील आठ वर्षा पासून त्यांची वैद्यकीय व्यवसायातील त्यांची दोन्ही मुले घेत असलेल्या मोफत आरोग्य शिबिर हे प्रेरणादायी आणि गोरगरिबांची सेवा करण्याचा घेतलेला वसा आहेत. तर त्यांचे सर्व कुटुंब हे एक आदर्श कुटुंब आहे.

—- दत्ता भाऊ बारगजे, 

         इन्फंट इंडिया

________________________________

आभाळाला गवसणी घालणारे कार्य :- अनेक दिवसा पासून सौ. दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांचे कार्य हे माहीत होते. परंतु प्रत्यक्ष भेट दिल्या नंतर येथील विद्यार्थी आणि त्यांचे संगोपन याची माहिती घेता आली. तसेच चाटे आणि बारगजे परिवार यांची दिवंगत नामदेव चाटे यांचे मरणोत्तर कोणतेही संस्कार न करता केलेले देहदान हे त्यांचे विचार आणि प्रत्यक्ष कृती याची जाणीव देणारे होते.

— रावसाहेब बचुटे, 

ऑनररी कॅप्टन (से. नि. )

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!