• Tue. Sep 22nd, 2026

केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते

Bybaba maske

Apr 20, 2026

केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप.

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही.

कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते. 

रोखठोक न्यूज | केज प्रतिनिधी

केज शहरात दिनांक १० तारखेला शुक्रवारी पिसाळलेल्या कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते. या घटनेला आज तब्बल १० दिवस उलटून गेले, मात्र अद्यापही केज नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेच्या दिवशी बसस्थानक परिसरासह मंगळवार पेठ व अजिजपुरा भागात या कुत्र्याने धुमाकूळ घालत अनेकांना चावा घेतला होता. मोठ्या संख्येने नागरिक जखमी झाले होते आणि उपजिल्हा रुग्णालयात रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांची गर्दी उसळली होती. काही रुग्णांना पुढील उपचारासाठी बाहेरील रुग्णालयात हलवण्यात आले होते.

मात्र एवढी गंभीर घटना घडूनही नगरपंचायत प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरात अजूनही मोकाट कुत्र्यांचा वावर सुरूच असून, कोणतीही पकड मोहीम किंवा लसीकरण मोहीम राबविण्यात आलेली नाही.

दरम्यान, स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांकडून प्रशासनावर तीव्र टीका होत असून, “घटना घडल्यावरही उपाययोजना नाहीत, मग नागरिकांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

इशारा:

जर तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही, तर नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

केज शहरातील वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता तरी प्रशासन जागे होऊन ठोस पावले उचलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

baba maske

Related Post

केसच्या मदतीचे आमिष दाखवत पीएसआय कडून महिलेवर अत्याचाराचा आरोप! रक्षकच झाला भक्षक; वडवणी पोलिस ठाण्यातील ग्रेड पीएसआय गणेश राठोड विरुद्ध गुन्हा, आरोपी फरार
विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!