शहरातील अनेक दुकानांमध्ये आजही प्लास्टिकचा सर्रास वापर होत आहे.तसेच ग्राहकही बिनधास्त प्लास्टिक कॅरिबॅग हातात घेऊन फिरत आसल्याचे बाजारपेठेत दिसत आहे यावर दंडात्मक किंवा जप्तीची कारवाई केल्याचे अढळून येत नाही.1 जुलै 20222 पासुन प्लास्टिक कॅरिबॅग किंवा प्लास्टिकच्या तत्सम वस्तु विकण्यास व वापरण्यास बंदी असताना व पाच हजार रूपायाचा दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार असताना केज नगरपंचायत ला त्याचे वावडे का आहे? या साठी विशेष पथक नियुक्त करावे लागते पण आता पर्यंत नगरपंचायतने ते केले का कसे? का पथक कारवाईत कमी पडत आहे त्या मुळेच सर्वत्र सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे.