• Wed. Jun 3rd, 2026

बापु यांना क्षमा करा.

Bybaba maske

Sep 1, 2022

बापु यांना क्षमा करा

केज तहसील कार्यालयासमोर दोन अन्याय ग्रस्त उपोषण कर्त्याच उपोषण चालू आहे तसेच टाकळी या गावी उपोषण चालू आहे.

1)केज तहसील कार्यालयासमोर बलात्कार पिढीत न्याय मागण्या साठी काल पासुन रस्त्याच्या कडेला वयोवृद्ध आई वडील व स्वतःच्या लहान मुला सह उपोषण करत आहे.मागणी काय तर ज्या व्यक्तीने बलात्कार केलाय तो गेल्या दोन महिन्यांपासून फरार आहे अजून पंर्यत तो सापडत नाही अॅट्रासिटी ॲक्ट गून्हा दाखल असताना एक दलित महिलेस स्वतःच्या न्याय हक्का साठी प्रशासनाच्या दारात बसावे लागत असेल तर काय म्हणावे.

2) मौजे टाकळी ता.केज येथे गेल्या चार दिवसांपासून महादेव घुले उपोषण करतायत.टाकळी फाटा ते चिंचोली माळी पंर्यत केलेला डांबरी रस्त्यात खुप मोठा भ्रष्टाचार झाला आहे.केलेला रस्ता निकृष्ट दर्ज्याचा केला वतो तात्काळ उखडला त्या वर तात्पुरती मलम पट्टी करून डागडूजी केली पण मुळातच कामात भ्रष्टाचार झाला असा आरोप आहे.तरी पण आज पंर्यत प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही गेल्या चार दिवसा पासुन.

3) लाडेगाव येथील दलित गायरान धारक गेल्या पंचवीस दिवसांपासून बेमुदत साखळी आमरण उपोषण करतायत.गेल्या तीस वर्षा पासुन वहिती करणारे गायरान जमीन गेल्या वर्षी हातातोंडाशी आलेल पिक गावगुंडानी रोटर व तननाशक फवारून उध्वस्त केल तसेच ह्या वर्षी पुनरावृत्ती होऊ नये त्या साठी पिकाला व दलित गायरान धारकांना संरक्षण मिळावे म्हणून गेल्या पंचवीस दिवसांपासून उपोषण करतायत.

पण या इंग्रजा पेक्षा अन्यायी प्रशासन व सरकार ला काडीचीही दखल घ्यावीशी वाटेना.कमीत कमी महात्मा गांधी इंग्रजा विरोधात देश स्वतंत्र करण्या साठी बसत तेंव्हा इंग्रज सरकार घाबरून जात असे.जे हत्यार गांधी सारख्या महात्म्याने आपणास दिले त्याची आज सरकार खिल्ली उढवतय.एक दलित माय माऊली आपल्या वर झालेल्या बलात्काराची लक्तरे तहसील कार्यालया समोर उघडे मांडून बसली असेल तर हे किती दुर्दैवी आहे.आज ही एकरभर गायरान जमीनी दलित समाजाला उपोषण करावे लागत असेल तर गांधीजी आम्हाला क्षमा करा,बाबासाहेब आंबेडकर त्या वेळेस आले नसते पुणे करार मोडला नसता व तुमचे उपोषण सुटले नसते.आज ही रस्त्यात भ्रष्टाचार झाला म्हणून देशाच्या 75 वर्षा नंतर जर उपोषण करावे लागत असेल तर….म्हणून म्हणावे लागते ह्या सरकारला व प्रशासनास.

   बापु तुम्ही क्षमा करा

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!