• Fri. Sep 11th, 2026

केज तालुका आरोग्य कार्यालय(जुना दवाखाना) नवीन जागेत बांधणार.

Bybaba maske

Sep 1, 2022

केज तालुका आरोग्य कार्यालय(जुना दवाखाना) नवीन जागेत बांधणार.

केज तालुका आरोग्य कार्यालय,उपजिल्हा रुग्णालयातील परीसरात नवीन बांधकाम पंधराव्या वित्त आयोगातुन मंजूर झाला असून जागा निश्चिती होऊन लवकरच पायाभरणी होणार.त्यामुळेच प्रश्न उपस्थित होत आहे की केज शहरातील जुनी दवाखान्याची इमारत खंडर होऊन ती जागा अतिक्रमित होऊन मोक्याची जागा कोणी भुमाफिया ताब्यात घेऊन,पत्र्याचे शेड टाकून किरायाने देऊन लोणी खात बसणार.तालुका आरोग्य कार्यालय हलवण्याचे कारण सुद्धा हास्यास्पद आहे,त्यांचे म्हणे आहे की कार्यालय शेजारी रक्त तपासणी प्रयोगशाळा असने गरजेच आहे.पण गेल्या कित्येक दिवसांपासून केज वासीयांची मागणी आहे की उपजिल्हा रूगणालय शहरा पासुन खुप लांब आहे त्या साठी आम्हाला जुन्या दवाखान्यात ओपिडी चालु करावी पण ह्या मागणी कडे दुर्लक्ष करून आरोग्य कार्यालय हलवण्याचा घाट घातला आहे.विषय जर रक्त चाचणी प्रयोगशाळेचा आहे तर बर्‍याच तपासण्या ह्या खाजगी महालॅब मध्ये होतात तर त्या जुन्या दवाखान्यात सुद्धा होऊ शकतात.दुसरा मुद्दा असा की खेड्या पाड्यातुन कार्यालयीन कामा साठी येणारे आरोग्य सेवक,डाॅक्टर यांना चार किलोमीटर जायचा यायचा भुर्दंड का? केज वाशीयांची मागणी आहे की तालुका आरोग्य कार्यालय न हलवता तेथेच ओपीडी चालु करावी नाहीतर येणाऱ्या दिवसात तिव्र अंदोलन करण्यात येईल.

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!