खड्यांमुळे झालेल्या अपघातांसाठी अधिकाऱ्यांवर गुन्हे का नकोत.
कोणते गुन्हे नोंदवले जाऊ शकतात.
जो कोणी निष्काळजीपण मुळे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो त्याला 304-अ या कलमाने शिक्षा देते.रस्त्यात वाहनाचा अपघात होऊन मृत्यू होऊ शकतो हे माहित असून ही दुरूस्ती न करणे यासाठी 10 वर्ष शिक्षेचे कलम लावता येते.337 कलम साध्या दुखापतीच्या बाबतीत, तर गंभीर दुखापत झाल्यास कलम 338 लागू केले जाऊ शकते.198_अ मोटार वाहन कायदा;रस्त्याचे बांधकाम किंवा देखभालीसाठी जबाबदार प्राधिकरण, कंत्राटदार,सल्लागार यांच्या चुकीने मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास संबधिताला एक लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.ही तरतूद 2019 पासुन आहे.परंतु अध्याप पंर्यत महाराष्ट्रात या कलमांतर्गत कोणतीही कारवाई झालेली नाही.
खड्डे पडल्यानंतर अपघात झाला नाही तरी ते दुरुस्त न करणे हा 283 अयपीसीप्रमाणे गुन्हा ठरू शकतो.जो कोणी सार्वजनिक मार्गावर धोका,अडथळा किंवा इजा पोहचवतो,त्याला या कलमा प्रमाणे शिक्षा होऊ शकते यात 200 रूपय दंडाची शिक्षा असली तरी तो दखलपात्र गुन्हा आहे.रस्ते आणि महामार्गाच्या अयोग्य देखभाली मुळे कोणत्या अपघात/घटने साठी प्राधिकरणाला जबाबदार धरले जाऊ शकते.मात्र यासाठी लोंकाना पोलीसांवर विंनती करून गुन्हा दाखल करावा लागेल.अपघात खड्यामुळे झाला तर तसे तक्रारीत लिहीने व हलगर्जीपणे वाहन चालवून अपघात करणाऱ्या चालकाबरोबर रस्त्याशी संबंधित अधिकाऱ्यांना आरोपी करण्या साठी तक्रारदाराने आग्रही रहावे लागेल.हायकोर्टाचे आदेश व नाराजी नंतर कारवाई होत नसेल तर हा पर्याय करून पाहायला काय हरकत आहे?