उपोषणकर्ते यांना भेटण्यासाठी प्रशासन उपजिल्हा रुग्णालयात दाखल
लवकरच काम चालू होणार दिले आश्वासन
केज/प्रतिनिधी
*उपोषणकर्ते यांना भेटण्यासाठी प्रशासन उपजिल्हा रुग्णालयात दाखल*
*लवकरच काम चालू होणार दिले आश्वासन*
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील टाकळी ता.केज या गावातील महादेव घुले हे आज ६दिवस झाले उपोषनास बसले आहेत.अचानक उपोषणकर्ते ची प्रकृती खालावली त्यांना तातडीने डॉक्टरच्या सल्याने अंबुलन्सने उपोषणकर्ते यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात प्रशासन भेटण्यासाठी दाखल झाले व त्यांनी उपोषणकर्ते यांना शब्द दिला की लवकर काम चालू करू.
केज तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत राज्यमार्ग क्रमांक ५६ टाकळी चौगरवस्ती ते राज्यमार्ग ६४ या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याबद्दल टाकळीचे सामाजिक कार्यकर्ते महादेव घुले यांनी अमरण उपोषण धरले आहे.व त्यांचे म्हणने आहे की वरील संदर्भहीन विषयाने मी मागील तीन वर्षांपासून मी तक्रार करत आहे कि मा.कार्यकारी अधिकारी,मा.कार्यकारी अभियंता (प्र.मा.गा.स.यो) यांच्या कार्यलया मार्फत चौकशी करून सुध्दा संबंधित गुत्तेदार व कार्यकारी अधिकारी यांच्यावर कसलीच कार्यवाही झालेली नाही तरी साहेबांनी माझ्या संदर्भीय तक्रारीची दखल घेऊन कारवाई होत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण सोडणार नाही.
सदर प्रकरणी काही बरेवाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असे सामाजिक कार्यकर्ते महादेव घुले यांनी म्हटले आहे.व त्यांनी उपोषण सुरू करुन ६ते७ दिवस झाले आहेत.
व सामाजिक कार्यकर्ते यांनी असे म्हटले आहे की राज्यमुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रामा-56 ते टाकळी चौगरवरती ते रा.मा 64 रस्त्याच्या कामाता-कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाले असुन त्याची चौकशी दक्षता व गुण नियंत्रक मंडळा मार्फत ठेकेदार व कार्यकारी अभियंता यांनी संगणमत करून भ्रष्टाचार केले बाबत महोदय,वरील विषयी तक्रारी अर्ज सादर केला आहे रोमा 56 ते टाकळी चौगरवस्ती ते रामा-64 या रस्त्याची व नळकांडी पुलाची कामाची अंदाजे किंमत 3 कोटी 13 लाख रुपये यामध्ये कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे.
सदरील रस्ता यापुर्वी डांबरीकरण होता तोच रस्ता उकरून तेथे फक्त मुरुम टाकुन दबई केली व खडीचा वापर थोडचाप प्रमाणात केला नाही.कारपेटचा भर 20 मी.मी.न वापरता 5 मी.मी. च वापरला आहे. सील कोटचा वापर केलेला नाही. नळकांडी पुलाचे काम 10 असुन त्यापैकी दोन पुले जुनेच असुन त्याला दुरुस्त केलेले आहे. व पुल खड्यामध्ये केले आहेत. त्यामुळे गाडी जम्पींग होत आहे.गावातील सांडपाणी काढण्यासाठी नाली अत्यंत आवश्यकता असुन सुध्दा नाली काढलेली नाही. गावातील रोडच्या कडेचे अतिक्रमणे काढणे. वरील सर्व कामाची चौकशी झाली नाही तर दि. 13/08/2019 रोजी टाकळी गावात अमरण उपोषण करण्यात येईल. सर्व गावकरी मंडळी टाकळी तरी साहेबांनी या कामाचा झालेला भ्रष्टाचाराची चौकशी दक्षता व गुण नियंत्रक मंडळा मार्फत करावी.
उपोषणार्थी यांचे म्हणणे____
माझ्याकडे शासकीय प्रशासनाचा आज काही अधिकारी मला भेटण्यासाठी आलेले होते. किंमत 3 कोटी 13 लाख रुपये यामध्ये कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. ठेकेदार व कार्यकारी अभियंता यांनी संगणमत करून भ्रष्टाचार केला.जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माझे उपोषण चालत राहणार. शासकीय प्रशासना यांना उपोषणकर्ते यांनी सांगितले की जो पर्यत काम चालू होतं नाही तोपर्यंत माझे उपोषण चालू राहणार.
महादेव घुले- टाकळी,ता,केजकेज तालुक्यातील टाकळी ता.केज या गावातील महादेव घुले हे आज ६दिवस झाले उपोषनास बसले आहेत.अचानक उपोषणकर्ते ची प्रकृती खालावली त्यांना तातडीने डॉक्टरच्या सल्ल्याने अंबुलन्सने उपोषणकर्ते यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात प्रशासन भेटण्यासाठी दाखल झाले व त्यांनी उपोषणकर्ते यांना शब्द दिला की लवकर काम चालू करू.
