• Sun. Apr 19th, 2026

प्रत्येक किराणामालाच्या दुकानात भावफलक लावण्याची मागणी 

Bybaba maske

Sep 23, 2022

प्रत्येक किराणामालाच्या दुकानात भावफलक लावण्याची मागणी


किराणा दुकानदार केसाने कापतायत गळा.

 जिल्हातील प्रत्येक होलसेल,किरकोळ किराणामालाच्यादुकानात भावफलक लावणे बंधनकारक असताना तसा कुठलाच फलक पुर्ण जिल्हात दुकानात लावलेला दिसून येत नाही.त्यामुळे ग्राहकास भाव कळत नाही त्यामुळेच दुकानदार अवाच्या सव्वा भाव लाऊन लुटतात,कांही मालाच्या भावात अठवड्यात पंधरवडय़ात भाव खालीवर  होतात पण दुकानदार ते कमी न करता वाढीव भावातच विकतात,साधारण ता ग्राहकास एक दोन जिन्नसाचे भाव माहीत असतात जसे की साखर,शेंगदाणे,तेल,रोजच्या वापरातील ह्याचा भाव फक्त दुकानदाररास विचारतात बाकी मग सगळ दुकानदाराच्या मनाचे भाव लावला जातो खरी लूट इथेच होते.कोलम तांदळाचे नमुने भरपूर आहेत मग ग्राहकाने सुट्टा ब्रॅण्ड कोलम मागीतला तर साधारण तांदूळ त्या गोणीत असतो तोच कमी भावाचा तांदूळ त्याच्या माथी मारून फसवले जाते.पुढचे दोन महिने सणासुदीचे(दसरा,दिवाळी) असल्याने प्रत्येक होलसेल,किरकोळ किराणामालाच्या दुकानात भावफलक लावून ग्राहकाची होणारी लूट थांबवावी असी जनतेतून मागणी होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!