• Wed. Jun 3rd, 2026

मुलगी झाल्याचा आनंद पुर्ण हाॅस्पिटल ची सजावट करून केला साजरा.

Bybaba maske

Sep 25, 2022

मुलगी झाल्याचा आनंद पुर्ण हाॅस्पिटल ची सजावट करून केला साजरा.

 

 मुलगी झाल्याचा सोहळा..पारधी समाजांच्या कुटुंबाने दिला वेगळा संदेश.

 आज 25 सप्टेंबर जागतिक कन्या दिन आज रोजी केज उपजिल्हा रूगणालयात अकिंता विकास पवार रा सोनीजवळा यांना कन्यारत्न प्राप्त झाले त्याचा आनंद उत्सव साजरा करण्या साठी मुलीच्या वडील विकास पवार याने स्व खर्चाने हाॅस्पिटल च्या प्रवेश द्वार व वार्डा मध्ये पुर्ण फुगे लावून,केक कापून व मिठाई वाटून साजरा केला.अकिंता ज्या वेळेस प्रस्तुती साठी आली त्या वेळेस तिची सिझेरियन करून प्रस्तुती झाली सिझेरियन साठी स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ.केशव इंगोले, भुलतज्ञ डाॅ बालासाहेब सोळुंके,अधिपरीचारीका ज्याती आरकडे व नासेर सय्यद यांनी केली होती, त्यामुळे नवजात मुलीच्या आई वडीलांनी त्या बाबत कृतज्ञता व्यक्त केली व आभार मानले त्याच प्रमाणे नवजात मुलीच्या आई वडीलाचे पुष्पगुच्छ देऊन डाॅ.इंगोले डाॅ.सोळंके व अधिपरीचारीका घोळवे सिस्टर,शिंदे सिस्टर, त्रिशाला कराड सिस्टर, विद्या मुळे सिस्टर, आयशाबी यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे.त्या जगल्या पाहीजेत या साठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच सर्वानी स्त्री जन्माच स्वागत नाराजीने नाही तर आंनदानेच साजरा करावा असा सल्ला देण्यात आला सद्या केज उपजिल्हा रुग्णालयात “माता सुरक्षित तर घर सुरक्षित”अभियान चालू आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत यांनी केले आहे व नवजात मुलीला व आईवडीलाना शुभेच्छा दिल्या आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!