रक्तदान शिबीराची नाडी उपलब्ध होणाऱ्या रुग्णवाहिके गाडीच्या सुकानुवर !
गौतम बचुटे/केज :-
सामाजिक क्षेत्रात काम करणारे सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करत असतात यासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रक्तपेढीकडे रक्त संकलनासाठी नेहमीच केज, धारुर, अंबाजोगाई, परळी आदी भागातील रक्तदाते रक्तदान करत असतात. यासाठी रक्तसंकलन करण्यासाठी शासकीय रुग्णालयाची टीम अतिशय चांगले काम करत असते; परंतु रक्त संकल करायला जाण्यासाठी रक्तपेढीला मागील तीन वर्षापासून स्वतःचे वाहन नाही. रक्त संकलनासाठी खाजगी रुग्णवाहिकेला बोलावून त्यांच्यावर अवलंबून राहून रक्त संकलनासाठी जावे लागत असल्यामुळे अनेकदा रक्तदान शिबीरासाठी उशीर होतो. खाजगी रुग्णवाहिका असल्यामुळे ते जर रुग्ण घेऊन गेले तर त्यांची वाट पहात बसावे लागते.
केज विधानसभा मतदासंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी रक्त पेढीच्या समस्या आणि भौतिक सुविधेकडे लक्ष देण्याची गरज आहे. आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे आणि सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा हे अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयाच्या बाबतीत खूप संवेदनशील आहेत. ते सातत्याने हॉस्पिटलला नेहमीच भेट देत असतात; परंतु तीन वर्षा पासून रक्तपेढीला वाहन नाही. म्हणून आता लोकप्रतिनिधींनी रक्त पेढीसाठी वाहनांसाठी प्रयत्न केल्यास अधिक चांगल्या प्रकारे संकलन करता येईल आणि रक्त दान हेच खरे जीवनदान आहे. याची प्रचिती पहायला मिळेल नाहीतर रक्त संकलनाची नाडी आता त्यांना उपलब्ध होणाऱ्या रुग्णवाहिकेच्या गाडीच्या भरवशावर अवलंबून आहे.