केज प्रतिनिधी : शेतकयांसाठीच्या मागेल त्याला विहीर या योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात एक लाखाची वाढ केली असून हे अनुदान आता चार लाख मिळणार आहे. याबाबतची घोषणा रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी नुकतीच जाहीर केली आहे. एक लाख रुपयांचे अनुदान वाढल्याने शेतकयांना याचा मोठा लाभ होणार असून लाभार्थ्यांची संख्याही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय आहे मागेल त्याला विहिर योजना?
कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जलसिंचनाची सोय होऊन बारमाही पाणी उपलब्ध व्हावे, शेतामधून हमखास उत्पादन घेण्यासाठी शेतात विहिरीची सोय व्हावी यासह विविध उद्देश ठेवून राज्य शासनाने मनरेगा अंतर्गत मागेल त्याला. विहीर योजना सुरू केली आहे.
तीनऐवजी आता चार लाख अनुदान मिळणा
मागेल त्याला विहीर योजनासाठी पूर्वी तीन लाख रुपये अनुदान मिळत होते; मात्र आता चार लाख अनुदान मिळणार आहे. या संबंधीचा आदेश अद्याप प्रशासनास प्राप्त झाले नसले तरी लवकरच आदेश येणार असल्याचे एका •अधिकाऱ्याने सांगितले.
अर्ज कसा कराल?
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधून शेतकरी आपले अर्ज | सादर करू शकतील. तसेच ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज सादर करण्याची मुभा उपलब्ध करून देण्यात आली आहे.