• Sun. Apr 19th, 2026

आमदार ताई! बेरोजगारांच्या लोंढ्यांना रोजगार द्या !!एम आय डीसी द्या.

Bybaba maske

Oct 9, 2022

आमदार ताई! बेरोजगारांच्या लोंढ्यांना रोजगार द्या !!एम आय डीसी द्या.

केज शहरातील फलोत्पादनाची 35 एकर _9 गुंठे MIDC ला वर्ग करा.

आमदार ताई अक्षय भैया तुम्ही हे करू शकतात.

केज तालुक्यात बेरोजगार तरुणाचे लोंढे च लोंढे जिकडे तिकडे दिसतायत,शिक्षण झाले आहे पण सरकारी खाजगी नोकर्‍या नाहीत दोन वर्षा पुर्वी आलेल्या कोरोनाने आयुष्याच मातेर केलय,असलेल्या नोकऱ्या गेल्यात, शिकून सवरून संद्या नाहीत म्हणून नोकरी नाही, काही व्यवसाय करावा तर भागभांडवला पेक्षा किराया जास्त. कराव तर काय कराव असा मोठा प्रश्न तरुण पिढी समोर आवासून उभा आहे.कितीही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तरी मार्ग निघत नाही.शासनाने मेक इन इंडिया,स्टार्टर ऑफ इंडिया,मुद्रा लोन असे काही योजना आणल्या आहेत पण जागे अभावी कांहीच करू शकत नाहीत.आता त्याच साठी केज तालुक्यात एम आय डीसी आसने खुप गरजेच आहे असे वाटू लागले आहे.त्यामुळेच सुक्षिशीत बेरोजगाराचे लोंढे कुठे तरी थांबले जातील.केज शहरात सुद्धा जागे अभावी व्यवसाय किंवा एखादा छोटा मोठा उद्योग उभारायचा म्हणजे जागा नाही.केज शहराच्या मधोमध असलेली फलोत्पादनांची 32 एकर 9 गुंठे पडीक जागा जर औद्योगिक वसाहती साठी शासना कडे पाठपुरावा करून ताब्यात  घेऊन एम आय डी सी उभारू शकतात. आमदार ताई हे तुम्ही करू शकतात कारण अक्षय भैया सारखा मतदान संघातला अडचणी जाणरा व्यक्ती तुमच्या सोबत आहे हा विश्वास केज तालुक्यातील जनतेत आहे.लवकरच हिवाळीअधिवेशनाचे बिगुल वाजणार आहे.त्यात प्रश्न उपस्थित करा असा आवाज बेरोजगार तरुणाई चा आहे तो तुम्ही ऐकताल असी अपेक्षा बेरोजगार तरुण लावून आहे,कारण तुमची काम करण्याची हातोटी स्वर्गीय विमलताई सारखी आहे.आज ज्या टोलेजंग शासकीय इमारती केज शहरात दिसतात त्या ताईचीच भेट आहे.तसीच भेट तुम्ही एम आय डीसी च्या माध्यमातून केज तालुक्याला द्यावी अशी मागणी आता सुक्षिशीत बेरोजगार तरुण करत आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!