*चिंचोली माळी येथे बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. स्नेहल सावंत रुजू*
गौतम बचुटे/केज :- प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली माळी येथे बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. स्नेहल सावंत या रुजू झाल्या आहेत.
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून दि. १० ऑक्टोबर पासून डॉ. स्नेहल सावंत या रुजू झाल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गित्ते यांनी डॉ. स्नेहल सावंत यांचा आदेश निर्गमित केला. त्या नुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोली माळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सांगळे यांनी बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सन्हेल सावंत यांना रुजू करून घेतले. यावेळी चिंचोली माळीचे सरपंच सुनिल देशमुख, शिवसंग्रामचे बाळासाहेब गलांडे, रावसाहेब बचुटे, पत्रकार संतोष गालफाडे, पत्रकार गौतम बचुटे, गुलाब पठाण, कल्याण घोडके, डॉ. सावंत यांचे आई-वडील सौ. नीता व सोमनाथ सावंत यांच्यासह आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.दै पुढारी चे पत्रकार गौतम बचुटे यांच्या त्या भाची आहेत.