• Sat. Jun 20th, 2026

रेड्याचे प्रेम म्हशींवर; अन् भांडण मालकांचे !*

Bybaba maske

Oct 11, 2022

*रेड्याचे प्रेम म्हशींवर; अन् भांडण मालकांचे !*

 

*म्हशीच्या मालकाने रेड्याच्या मालकाचे डोक्यात दगड घातला !*

*म्हशींची रेड्या सोबत लगट अन् मालकांचे भांडण !*

 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात एका म्हैस मालकाने रेड्याच्या मालकाच्या डोक्यात दगड घालून त्याचे डोके फोडले आहे. त्याला कारणही तेवढेच मजेशीर आहे.
केज तालुक्यातील आरणगाव येथील म्हैस मालक ऋषिकेष रामलींग भांगे यांच्या मालकीची म्हैस माजावर आल्यामुळे तिचे नंतर तिचे नैसर्गिक रेतनासाठी आरणगाव येथील नारायण दौलत सिरसट यांच्या मालकीच्या रेड्याकडे नेण्यात आले. अशा पद्धतीने वळू द्वारे रेतन केल्यास त्यासाठी म्हैस मालकाने त्याचा मोबदला द्यावा लागतो. मात्र नारायण सिरसट रेतनाचे पैसे मागितले म्हणून ऋषिकेष रामलींग भांगे याने सोमवार दि. १० ऑक्टोबर रोजी ब्रम्हणामाता मंदीराच्या बाजुला रोडवर दुपारी २:३० वा. च्या दरम्यान नारायण दौलत सिरसट याच्या डोक्यात दगड मारून जखमी केले.
या प्रकरणी नारायण दौलत सिरसट याच्या फिर्यादी वरून ऋषिकेष रामलींग भांगे याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४५९/२०२२ भा. दं. वि ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या म्हैस रेड्याच्या अनोख्या प्रेम प्रकरणातून रेड्याच्या रेतनाचे पैसे मागितल्याच्या रागातून म्हैस मालकाने रेड्याच्या मालकाचे डोके फोडले याची चर्चा चवीणे चर्चिली जात आब्रम्हणा मंदीराच्या बाजुला रोडवरहे.

baba maske

Related Post

नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंबाजोगाईत गुंडगिरीचा कळस! बारावीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला; डोक्यात दांडक्याचे घाव, प्रकृती चिंताजनक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!