केज शहराला गेल्या तीन दिवसांपासून महावितरण दहा के व्ही डिपी बसवण्याच्या नावा खाली काळोखात लोटले आहे.बुधवारी दिवसभर,गुरूवारी “कधी येते कधी जाते” या स्वरूपात तर आज शुक्रवारी पण लाईट चा पत्ता नाही.46 हजार नागरिक बेजार झालेत.कुणाचे पाणी संपले आहे.(घरातील बोरसे पाणी भरायचे आहे) पिण्या साठी सुद्धा पाणी नाही असी अवस्था आहे कोणाला दळण नाही.ऑफिसचे ऑनलाइन काम ठप्प आहे,हाॅस्पिटल मध्ये रूूग्ण परेशान. करावे तर काय हा प्रश्न पडला आहे.महावितरणचा भोंगळ कारभार कधी थांबणार हे देवालाच ठाऊक.नेते शांत,जनता त्रस्त, महावितरण भोपळ्यात मस्त.